संस्कृती

संवाद : शुभदा जोशी (महिला दिन २०१०)

Submitted by क्षिप्रा on 8 March, 2010 - 20:49

The Young Collegiate Woman - श्रुती एकतारे (महिला दिन २०१०)

Submitted by लालू on 7 March, 2010 - 21:49

mahila_1.jpg

श्रुतीला मी ती प्राथमिक शाळेत असल्यापासून ओळखते. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. 'संयुक्ता' च्या 'महिला दिन' कार्यक्रमाबद्दल मैत्रिणीशी बोलत असताना ती सहज म्हणून गेली की श्रुती यानिमित्ताने काहीतरी लिहू शकेल. श्रुती एवढी मोठी झाली हे तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली कश्या प्रकारचं लेखन हवं, Serious, stat-oriented, or whimsical, personal-oriented? Happy थोडं 'हलकंफुलकं' असलं तर बरं अस मी कळवल्यानंतर पुन्हा आठवण करुन देण्याआधीच आठवड्याभरात लेख माझ्याकडे आलासुद्धा!

प्राचीन जलस्त्रोत (भाग १) - मुंबई

Submitted by शर्मिला फडके on 1 March, 2010 - 14:55

मुंबईपुढचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात दुर्लक्षिला गेलेला प्रश्न कोणता असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. मुंबईपुढचे पाणीटंचाईचे संकट दरवर्षी उग्र स्वरुप धारण करत आहे. पावसाळ्यात तानसा,वैतरणा,विहार्,मोडकसागर तलाव भरुन वाहू लागल्याच्या बातम्या एकेकाळी वर्तमानपत्रांमधे आल्या की आता उन्हाळ्यापर्यंत पाणी नक्की पुरणार असं समजून मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडायचा.

मराठी भाषा दिवस - स्पर्धा निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक on 27 February, 2010 - 21:15

नमस्कार मंडळी,

संवाद साधणं ही सजीवांची जवळपास मूलभूत गरजच! प्राणीपक्षीसुद्धा अन्न सापडल्याची किंवा धोक्याची सूचना विशिष्ट ध्वनी करून आप्तस्वकीयांना देतात. माणसाची धाव त्यापुढची. 'भाषा' हे त्याच्यासाठी केवळ 'माहितीची देवाणघेवाण' करण्याचं माध्यम किंवा साधन नाही. ते त्याच्या जगण्यातलं एक आनंदनिधान आहे. तो भाषा 'वापरत' नाही, तो एखाद्या शिल्पासारखी भाषा 'घडवतो', तिला अलंकारांची लेणी चढवतो.. आणि हे करतांना नकळत स्वतःही अधिक सुसंस्कृत घडत जातो.

बोलगाणी

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:45
bolgani.jpg