नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च. 'जागतिक महिला दिन'.
या निमित्त 'संयुक्ता' तर्फे गरजू संस्थांना देणगी देण्यात यावी अशी कल्पना मांडली गेली. हे काम 'सुपंथ' तर्फे करता येऊ शकेल का अशी विचारणा केल्यावर 'सुपंथ' चे काम पहाणार्या सदस्यांनी तशी तयारी दर्शवली. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).
'वाट'
दोआ विमानातल्या तिच्या सीटवर सावरुन बसली. नेहमीसारखीच सावध. ती अजुनही निश्चिंत झाली नव्हती. उलट या क्षणी मनात भावभावनांचा कल्लोळ उठला होता. सुटकेचा आनंद, अविश्वास, हुरहुर, अधीरता आणि कुठेतरी थोडी भीती. हे सगळं निरर्थक तर ठरणार नाही नां? खोल श्वास घेत एअर होस्टेसनं आणुन दिलेल्या कॉफीचा सुवास तिनं आतपर्यंत भरुन घेतला.
*********************
श्रुतीला मी ती प्राथमिक शाळेत असल्यापासून ओळखते. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी. 'संयुक्ता' च्या 'महिला दिन' कार्यक्रमाबद्दल मैत्रिणीशी बोलत असताना ती सहज म्हणून गेली की श्रुती यानिमित्ताने काहीतरी लिहू शकेल. श्रुती एवढी मोठी झाली हे तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं. तिला विचारल्यानंतर ती म्हणाली कश्या प्रकारचं लेखन हवं, Serious, stat-oriented, or whimsical, personal-oriented? थोडं 'हलकंफुलकं' असलं तर बरं अस मी कळवल्यानंतर पुन्हा आठवण करुन देण्याआधीच आठवड्याभरात लेख माझ्याकडे आलासुद्धा!
महिला दिनानिमित्त 'संयुक्ता' तर्फे या आठवड्यात सादर होणार्या कार्यक्रमातला हा पहिला लेख-
८ मार्च २०१०. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकपूर्ती वर्षातला हा जागतिक महिला दिन. जगभरातल्या तुम्हां-आम्हांसारख्या सार्याच कष्टकरी महिलांच्या दृष्टीने या एका दिवसाचे महत्त्व नक्की काय आहे हे मुद्दाम जाणून घेतल्याशिवाय कदाचित नीटसे उमगणारही नाही.