



आपली छोटी मायबोलीकर "जुई" हिने वरील मजकुर लिहिण्यास मदत केली आहे.
ही स्पर्धा खालील वयोगटात घेण्यात येणार आहे:
गट क्रमांक १: प्रिस्कुल ते इयत्ता पाचवी
गट क्रमांक २: इयत्ता सहावी ते नववी
गट क्रमांक ३: इयत्ता दहावी ते बारावी
स्पर्धेचे विषय :
१. आवडता मराठी सण
२. आईबाबांबरोबर घालवलेला सुट्टीचा दिवस
३.मला मराठी बोलायला का आवडते वा आवडत नाही
४.आईबाबांच्या कामाची अदलाबदल
५.माझी आवडती व्यक्ती/मित्र/मैत्रिण
६. आई सुट्टीवर जाते
स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Evalese Rop असे नमूद करावे.
स्पर्धेसाठी माध्यम: लिखीत (स्कॅन करुन), व्हिडीओ, ऑडिओ
साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०
अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha at maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच धाग्यावर आपला प्रश्न विचारावा.
अरे वा ! छान उपक्रम. माझी
अरे वा ! छान उपक्रम.
माझी मुलगी अजुन लहान आहे. तेव्हा ह्या स्पर्धेत भाग नाही घेऊ शकणार.
राहुल, तिला बोलगाणी मधे भाग
राहुल, तिला बोलगाणी मधे भाग घेता येइल.
निबंध लिहीण बरच कठीण आहे. लेक
निबंध लिहीण बरच कठीण आहे. लेक पहीलीत आहे.आत्ताशी कुठे बाराखडी शिकायला सुरुवात झालेय शाळेत. ऑडीओ/ व्हिडीओ करायचा प्रयत्न करते
अरे वा मस्तच उपक्रम
अरे वा मस्तच उपक्रम
ऑडीयो/ व्हिडीयो फाईलची लांबी
ऑडीयो/ व्हिडीयो फाईलची लांबी किती मिनिटांची असावी याला काही मर्यादा आहे का? तसंच निबंधाला शब्दमर्यादा आहे का?
पूनम, निबंधाला शब्दमर्यादा
पूनम, निबंधाला शब्दमर्यादा नाही. तसेच ऑडिओ/व्हिडीओ फाइलच्या लांबीवर बंधन नाही.
संयोजक! साडेपाच वर्षाच्या
संयोजक! साडेपाच वर्षाच्या मुलांना यात भाग घेता येईल का? कारण तुम्हि पहिला वयोगट पहिली ते पाचवी (६ वर्षापुढे)लिहला आहे.
आवडता सण चालेल ना?
आवडता सण चालेल ना?
प्राजक्ता, वयोगट प्रीस्कूल ते
प्राजक्ता, वयोगट प्रीस्कूल ते पाचवी आहे गं.
डूआय, आवडता मराठी सण असा विषय आहे ना? ही मराठी भाषा दिवस स्पर्धा आहे.
ओके ठीके.
ओके ठीके.
संयोजक प्रिस्कुलला सामिल
संयोजक प्रिस्कुलला सामिल केल्याबद्दल धन्यवाद!
(चिन्नु ते आता बदलले आहे,आधि पहिली ते पाचवी होता वयोगट)
आता करा पटापट प्रवेशिकेची
लोकांची मागणी लक्षात घेवुन
लोकांची मागणी लक्षात घेवुन "इवलेसे रोप" वरील वयोगटामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता प्रिस्कुल आणि किंडर मधील मुलानाही या स्पर्धेत सामील होता येईल.
चला तर स्पर्धेच्या तयारीला लागा.
मैत्रेयीला मराठी लिहिता येत
मैत्रेयीला मराठी लिहिता येत नाही
आणि बडबड गीताच्या स्पर्धेत भाग घेण्याएव्हढी लहान ती नाही
. असो , भाग घेणार्या सर्वांना शुभेच्छा .
संपदा ऑडिओ/व्हिडिओ पण चालतील
संपदा ऑडिओ/व्हिडिओ पण चालतील अस म्हंटलय वर
ओह येस , ते मी पाहिलेच नव्हते
ओह येस , ते मी पाहिलेच नव्हते . ते होऊ शकेल . थँक्स कविता .
ज्या मुलाना मराठीत लिहिता येत
ज्या मुलाना मराठीत लिहिता येत नसेल त्याना ऑडीओ किंवा व्हिडीओ च्या माध्यमातुन या उपक्रमात सहभागी होता येइल.
ज्या मुलांना मराठी लिहिता,
ज्या मुलांना मराठी लिहिता, वाचता आणि बोलताही येत नसेल त्यांचं लेखन मराठीत भाषांतर करून पाठवलं तर चालेल का?
ज्या मुलांना मराठी लिहिता,
ज्या मुलांना मराठी लिहिता, वाचता आणि बोलताही येत नसेल त्यांचं लेखन मराठीत भाषांतर करून पाठवलं तर चालेल का?>>>>>
नाही.प्रवेशिका मुलानी स्वहस्ताक्षरात लिहिलेली अथवा म्हटलेली असायला हवी.
संयोजक मंडळ इथे परत एकदा ह्या
संयोजक मंडळ इथे परत एकदा ह्या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करु इच्छितात.
मुलाना "मराठी" बोलण्यासाठी/लिहिण्यासाठी प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे, अगदी ५ ओळी सुद्धा चालतील. पण त्या मुलानी स्वहस्ते लिहिलेल्या/म्हटलेल्या असाव्यात हाच या स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी निकष आहे.
धन्यवाद.:)
.
संयोजक, उतरासाठी धन्यवाद!
संयोजक, उतरासाठी धन्यवाद!
संयोजक, या पानाच्या उजव्या
संयोजक,
या पानाच्या उजव्या बाजुला "हा ग्रुप फक्त निमंत्रितांसाठी आहे. ग्रुपचे व्यवस्थापक सभासदांना प्रवेश देऊ शकतात." असं लिहिलेलं आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी असं काही सभासदत्व घेणं अपेक्षीत आहे का?
नाही मंजिरी. स्पर्धेत भाग
नाही मंजिरी. स्पर्धेत भाग घेण्यासाठी वर लिहिल्याप्रमाणे marathibhasha@maayboli.com ला मेल पाठवायची आहे.
तो ग्रूप फक्त संयोजक समितीसाठी आहे. सभासदत्व घ्यायची जरूरी नाही.
धन्यवाद!
धन्यवाद!
एक छोटी प्रवेशिका पाठवली आहे,
एक छोटी प्रवेशिका पाठवली आहे, क्रुपया पोहोच द्यावी ही विनन्ती
प्रोमोमधील जुईचे वाचन भारीये
प्रोमोमधील जुईचे वाचन भारीये अमृता. मस्त वाटलं ऐकुन.
छान आहे अमृता.
छान आहे अमृता.
धन्यवाद मैत्रिणींनो....
धन्यवाद मैत्रिणींनो.... रैनातै तुलाच खर क्रेडीट
मायबोलीकरांनो आता अजुन अश्या भरपूर प्रवेशिका येउद्या.
अमृता, कित्ती गोड आहे गं
अमृता, कित्ती गोड आहे गं जुईचं बोलणं! मस्त एकदम!!
अमृता खरेच छान बोलली गं जुई.
अमृता खरेच छान बोलली गं जुई. मी पण आत्ताच बघितले हे.
Pages