कसं आहे ना
मला वाद आणि प्रतिवादाचा
मनापासून कंटाळा येतो
नाहीच आवडत मला वाद घालायला
तुझं आपलं नेहेमीच पालपुद की..
तूला वाद घालायला काहीही
कारण चालत म्हणून...
जाऊ दे ना...दे की सोडून असं म्हणताना
तू विचार करायला हवाच आहेस
की
काही गोष्टी मांजराचे पिल्लू सोडतात
तसे दूर सोडून नाहीच देता येत
हे आजचच उदाहरण बघ ना...
कितीही वाद टाळायचा प्रयत्न केला तरी
तुझा आजचा शर्ट...
असा डिझाईनचा शर्ट ...
कसा काय आवडू शकतो तुला..
आणि तो ही वेलबुट्टीच्या नक्षीचा...
खरंच अश्यक्य आहेस तू...
तुला मला विभागून जाते एक रेघ
कुणाच्या बाजूने बरसावे ह्या वादात निघून जातात मेघ
वाद येतात काही काळ आपल्यात पाहुणचार घ्यायला
मग शांत मन लागते आपलेच घर सोडून जायला
वाद असतो कि खोटा अहंकार
उरतो मग व्यवहार किती होकार किती नकार
आज आपलेच घर सांगतेय जगाला दुःखाचे कारण
काय सांगणार, वादाचे असते घराला रोज नवे तोरण
बरेच झाले वादा नंतर वाद
हवाय आता एक सवांदाचा नाद
‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ति चारी साधियेल्या’ अश्ाी संत ज्ञानेश्वरकृत हरिपाठाची पहिलीच ओवी आहे. देवाचे अगदी क्षणभराचे दर्शनही चारी मुक्ती देण्यास समर्थ असते, असा विश्वास ज्ञानदेव पहिल्याच ओवीत देतात. मात्र, ते मनोभावे असले पाहिजे. सध्या शनिदेवाच्या दर्शनावरून सुरू असलेल्या वादामध्ये हा हट्ट करणारांची ही श्रध्दा आहे की, हटवाद असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, तर दुसरीकडे देवस्थानचे विश्वस्त मंडळ आणि गावकऱ्यांकडून प्रथा परंपरेला छेद न देण्यासाठी सुरू असलेला आटापिटाही कितपत योग्य आहे, याविषयीही सामान्य भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्यास ते चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.
बहुसंख्य धाग्यांवर जात, धर्म, राजकारण, श्रद्धा / अंधश्रद्धा अश्या विषयांवरून वाद होऊ लागलेले आहेत. चिथावणीखोर प्रतिसाद, उपरोधिक ताशेरे, आक्रमक भाषा, आकसयुक्त विधाने, तीव्र संताप व्यक्त करणारे युक्तिवाद ह्या सर्वांनी युक्त अश्या चर्चा सर्वत्र दिसत आहेत. काही वाहत्या पानांना केवळ वाहती व गप्पांची पाने म्हणणे अशक्य झालेले आहे. तेथे फोरमवर काय वाचावे, त्यावर काय भूमिका घ्यावी, काय लिहावे ह्याच्या जणू योजना आखल्याप्रमाणे चर्चा होत आहेत. स्क्रीन शॉट्स घेणे, तक्रारी करणे हे तर आहेच पण उघड उघड आपल्या नावडत्या नेत्यांबद्दल व समूहांबद्दल अनुचित उल्लेख सहजपणे होत आहेत.
संस्कृत ही जवळजवळ सर्वच भारतीय भाषांची (लिप्या म्हणत नाही) जननी आहे. तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)
हिंदीभाषिकांसोबतच्या दीर्घ सहवासात जाणवलेली आणि आढळलेली काही निरीक्षणे, त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे. (हिंदीभाषिकांची मराठीप्रति माया पाहता मायबोलीवर कुणी हिंदीभाषिक प्रतिनिधी असेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षपाती उहापोह घडेल अशी भीती वाटते.)
खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.