तुझा आजचा शर्ट
Submitted by राजेश्री on 9 August, 2018 - 22:14
कसं आहे ना
मला वाद आणि प्रतिवादाचा
मनापासून कंटाळा येतो
नाहीच आवडत मला वाद घालायला
तुझं आपलं नेहेमीच पालपुद की..
तूला वाद घालायला काहीही
कारण चालत म्हणून...
जाऊ दे ना...दे की सोडून असं म्हणताना
तू विचार करायला हवाच आहेस
की
काही गोष्टी मांजराचे पिल्लू सोडतात
तसे दूर सोडून नाहीच देता येत
हे आजचच उदाहरण बघ ना...
कितीही वाद टाळायचा प्रयत्न केला तरी
तुझा आजचा शर्ट...
असा डिझाईनचा शर्ट ...
कसा काय आवडू शकतो तुला..
आणि तो ही वेलबुट्टीच्या नक्षीचा...
खरंच अश्यक्य आहेस तू...
विषय: