देवदर्शन

सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख

Submitted by Abuva on 6 December, 2022 - 00:53
Mandir

त्या प्राचीन मंदिराच्या प्रचंड गोपुराखालून प्रवेश‌ घेतानाच मनावर एक गारूड घडतं. आपण देवाच्या सान्निध्यात प्रवेश करतोय हे तर जाणवतंच, पण ते देवत्व गगनचुंबी आहे हे समजतं. विस्तीर्ण पसरलेली ही दाक्षिणात्य मंदिरं प्राचीनता, आकार, सौंदर्य, समृद्धी, महत्ता या कोणत्याच अर्थांनी खुजी नाहीत. मी एका चौकस, उत्सुक प्रेक्षक या भावनेने इथे दाखल झालेलो असतो. एका पुस्तकातल्या या मंदिरांच्या वर्णनानं प्रभावित होऊन, अचानक आलेली संधी साधून आलेलो असतो.

विषय: 

दर्शनमात्रे

Submitted by टोच्या on 5 April, 2016 - 07:09

‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ति चारी साधियेल्या’ अश्‍ाी संत ज्ञानेश्वरकृत हरिपाठाची पहिलीच ओवी आहे. देवाचे अगदी क्षणभराचे दर्शनही चारी मुक्ती देण्यास समर्थ असते, असा विश्वास ज्ञानदेव पहिल्याच ओवीत देतात. मात्र, ते मनोभावे असले पाहिजे. सध्या शनिदेवाच्या दर्शनावरून सुरू असलेल्या वादामध्ये हा हट्ट करणारांची ही श्रध्दा आहे की, हटवाद असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, तर दुसरीकडे देवस्थानचे विश्वस्त मंडळ आणि गावकऱ्यांकडून प्रथा परंपरेला छेद न देण्यासाठी सुरू असलेला आटापिटाही कितपत योग्य आहे, याविषयीही सामान्य भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्यास ते चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - देवदर्शन