कृत्रिम पावसात
एकापेक्षा एक विध्वंस करत
निसर्गाने इतिहास रचला आहे
शेतकर्यासह सामान्य माणूस
आता दुष्काळाने खचला आहे
अनपेक्षित नैसर्गिक कोपामुळे
अपेक्षांचे भांडार थिजु लागले
तरीही मात्र मनातील स्वप्न
कृत्रिम पावसात भिजु लागले
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ग्रा.पं. निवडणूक
घरा शेजारील घरं देखील
कट्टर विरोधक बनले जातात
तर कट्टर विरोधकांशीही कधी
स्नेहाचे बंध विनले जातात
प्रत्येक-प्रत्येक उमेदवारालाही
एका-एका मताची भुक असते
मात्र सहजा-सहजी न कळणारी
ग्रामपंचायतीय निवडणूक असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
चव
ज्या गोष्टींचा आदर करावा
त्यांची कदर होत नाही
चांगल्याचाही चांगुलपणा
कधी सादर होत नाही
कोणत्या गोष्टींना कसे पहावे
हे तर संस्काराचे पेव असते
मात्र बेचव माणसांना
चवीचीही चव नसते,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विकास कामं
प्रत्येकाचा हिस्सा ठरवुन
विकास निधी वाटले जातात
पुढचे कामं थाटत असताना
मागचे कामं फूटले जातात
पुन्हा नविन बजेटसाठी
कुणी नव्याने नटले जातात
जुने कामं झाकून ठेऊन
नविन हाती घेतले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
राजकारण
पतीकडे एक पद
पत्नीकडे एक पद
आपत्यांची मात्र
पदासाठी खदखद
सासु-सासरे अनुभवाच्या
एकेक पुड्या सोडतात
अन् समाजाचे राजकारण
घरातल्या-घरात घडतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सत्य स्थिती
यांच्या डोळ्यात ते दोषी
त्यांच्या डोळ्यांत हे दोषी
आरोप मात्र लागत नाहीत
का दोघांच्याही अंगाशी,.?
विरोधी चेहरे समोर पाहून
संयम जणू बंडाळले जातात
आरोप असो वा प्रत्यारोप
गोंधळात गुंडाळले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जीवनात
जीवन हे खुप सुंदर आहे
मात्र सुंदरतेत येऊन बघावे
सुंदर जीवन जगण्यासाठी
गतानुगतिक होऊन वागावे
जाणीवपुर्वक वा अभावितपणे
कधीच हातुन घडु नये गुन्हा
करा आयुष्यात सत्कार्य सदैव
हे जीवन नाही पुन्हा-पुन्हा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जाती-धर्म
मना-मनात वाढणारी
जाती-धर्माशी आपुलकी असते
जाती-धर्मीयांचा पुळका
हि गोष्टही शेलकी असते
ज्याच्या-त्याच्या संस्कारानुसार
ज्याच्या-त्याच्या शिस्त असतात
मात्र कर्तृत्ववान माणसं कधीच
जाती-धर्मात बंधिस्त नसतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कलामजी,...
वर्तमान घडवता-घडवताना
भविष्यकाळही घडवला आहे
तुमच्या एका-एका आठवणीने
अख्खा भारत रडवला आहे
तुम्ही बांधलेल्या धोरणांमध्ये
परिस्थिती आजही गुलाम आहे
कालही तुम्हाला सलाम होता
आजही तुम्हाला सलाम आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३