प्रशासन
तडका - कर्ज फेड
तडका - पत्रकार सुरक्षा,...?
पत्रकार सुरक्षा,...?
वाढते हल्ले पत्रकारांवरचे
दिवसें दिवस वाढू लागलेत
अन् गंभीर-गंभीर प्रकरणंही
काळाच्याआड दडू लागलेत
ज्यांनी सत्याचा आवाज उठवला
त्यांचाच आवाज दबला जातोय
अन् पत्रकार सुरक्षिततेचा प्रश्न
सरकार दारी राबला जातोय,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका - घोटाळ्यांत
घोटाळ्यांत
ज्यांची प्रगती व्हायला हवी
त्यांनाच अजुन लाभ नाही
आम्हाला याची जाण आहे
हि साधी-सुधी बाब नाही
ज्यांचे विचारच भ्रष्ट आहेत
त्यांच्यात फरक ना पडतो आहे
जिथे महापुरूषांची नावं आहेत
तिथेही भ्रष्टाचार घडतो आहे
अशा घोटाळ्यांचे प्रकरणंही
रोज-रोज ताजे येत आहेत
माणसांच्या नजरेतुन माणसं
पुन्हा-पुन्हा खुजे होत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका - नवा घोटाळा
तडका - फेसबुक फ्रेंड
फेसबुक फ्रेंड
पुढची व्यक्ती कोण असेल
याची जरी खात्री नसते
तरी आत्मीयता जपणारी
फेसबुक वरील मैत्री असते
अनोळखीच्या ओळखीचीही
कधी आपुलकी वाटू लागते
अन् अनोळखींच्या भेटीची
मनी उत्सुकता दाटू लागते
माणसं जोडण्याचा दुवा म्हणून
सोशियल मिडीया घेतला जातो
तर भावनीकतेचा आधार घेऊन
कधी-कधी गंडाही घातला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
देशभक्ती आणि स्वार्थत्याग
नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात .
तडका - आतल्या गाठी
तडका - कर्ज माफी,...!
तडका - भविष्य विद्यार्थ्यांचे
भविष्य विद्यार्थ्यांचे
जिथे पोषक आहार मिळावा
तिथे विष प्रहार होतो आहे
विद्यार्थ्यांना विषबाधा होणे
हा प्रकार समोर येतो आहे
जेवनातुन विषबाधा होणे
असे प्रकारच घडू नयेत
ज्यांच्या हाती भविष्य आहे
त्यांचे भविष्य बिघडू नयेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
व्हाटस्अप वरून सदरील वात्रटिका इमेज स्वरूपात मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783