इतिहासाचे पान
ज्यांनी पारतंत्र्य भोगलं आहे
त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळते
स्वातंत्र्यासाठी सांडलेल्या रक्ताने
स्वातंत्र्य लढ्याची हिंमत मिळते
या स्वातंत्र्यासाठीही क्रांतीवीरांनी
पारतंत्र्यात दु:ख सोसलेलं आहे
त्यांच्या इतिहासाचं पानन् पान
आजही रक्तानं माखलेलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
या जगण्याला
पारतंत्र्याचे दु:ख सोसुन
स्वातंत्र्याचे सुख वाटले
या देशाच्या क्रांतीवीरांनी
भारत मॉ चे रूप थाटले
त्या वीरांच्या क्रांती लढ्याने
स्वातंत्र्याची चव कळाली
अगाध त्यांच्या परिश्रमाने
या जगण्याला ढव मिळाली
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
एक निमित्त गटारीचे
कुणी स्वयं उतावळे असतात
कुणासाठी मात्र फूस असतात
रोज-रोज खाणारे-पिणारेही
गटारीवरती खुश असतात
गटारोत्सव साजरा करण्याचा
मनात हेका धरला जातो
अन् एक दिवसाच्या निमित्ताने
गटारीवर ताव मारला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
गदारोळ
प्रत्येकाला बोलायचं आहे पण
ऐकुन घेण्याची क्षमता नाही
दुसर्यांना मत मांडताना देखील
बोलण्याचा ओघ थांबता नाही
ऐकुन न घेण्याच्या मुद्यांना
कधी गोंगाटात घेतले जातात
अंगलट येणार्या गोष्टींवरून
गदारोळही घातले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
गदारोळ
प्रत्येकाला बोलायचं आहे पण
ऐकुन घेण्याची क्षमता नाही
दुसर्यांना मत मांडताना देखील
बोलण्याचा ओघ थांबता नाही
ऐकुन न घेण्याच्या मुद्यांना
कधी गोंगाटात घेतले जातात
अंगलट येणार्या गोष्टींवरून
गदारोळही घातले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
राजकीय दृष्टीत
तिसर्या आघाडीच्या चर्चेमुळे
राजकीय वारे टाईट आहेत
कुणी फूशारकी मारण्यात तर
कुणी हूशारकीत पटाईत आहेत
कुणा-कुणाची फूशारकी इथे
भलतीच अग्रगण्य असते
मात्र राजकीय दृष्टीने पाहिल्यास
जणू हूशारीपुढे ती शुन्य असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
दुष्काळी पर्यटन
वरचे आलेत फिरून जातील
खालचेही येऊन फिरून जातील
दुष्काळी भागाच्या दौर्यासाठीही
कुणी उदंड खर्च करुन जातील
आता नव्या-नव्या दौर्यांचीही
रोज-रोज नविन खबर येते
दुष्काळाच्या नावानं का होईना
पण पर्यटन मात्र जबर होते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नाना मकरंद
या दुष्काळलेल्या माणसांना
त्यांनी माणूसकी वाटलेली आहे
या मातीतल्या त्या लेकरांची
मातीशी नाळ ना तुटलेली आहे
शेतकर्यांचे अश्रु पाहून
मन त्यांचं तळमळलं आहे
सरकारला जे कळलं नाही
ते नाना,मकरंदला कळलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
अंधश्रध्देत
जिथे श्रध्देनं लोक जातात
तिथेही अंधश्रध्देत बुडतात
असे अंधश्रध्देचे प्रकारही
आता दाटीवाटीने घडतात
डोक्या-डोक्यात प्रगल्भ अशा
अंधश्रध्देच्या खाई आहेत
अन् अंधश्रध्दा पसरविण्याला
हल्ली बुवा बरोबर बाई आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
देवाच्या दारी,...!
देवाला सर्व समान असतील
देवादारी समान आहेत का,.?
आपण हे काय करतो आहोत
सांगा याचे गुमान आहेत का,.?
साधे दर्शन,व्हिआयपी दर्शन
देवाच्या दारी ठेवलेले आहे
देवाच्या दारी बाजार मांडून
गुमास्त्यांचे फावलेले आहे
गरीब आणि श्रीमंत असे
भक्तांचे प्रकार होऊ लागले
अन् देवाच्या दर्शना साठीही
आता लोक तिकीट घेऊ लागले
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३