प्रशासन

तडका - पुरस्कारांच्या इतिहासात

Submitted by vishal maske on 19 August, 2015 - 10:27

पुरस्कारांच्या इतिहासात

जशा सकारात्मक गोष्टी घडतात
तशा नकारात्मकही घडत असतात
अन् सामाजिक द्वेष-भावांच्या मध्ये
सत्य मांडणारेही पीडत असतात

वर्तमानात घडणारे प्रत्येक क्षण
भविष्याचा इतिहास राहिले जातील
अन् पुरस्कारांच्या इतिहासाबरोबर
घडलेले वादही पाहिले जाताल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - भविष्यात

Submitted by vishal maske on 18 August, 2015 - 22:12

भविष्यात

मना-मनात फोफावणार्‍या
प्रसिध्दीच्या भुका आहेत
जातीय सलोखा साधने या
लांच्छनास्पद चुका आहेत

वर्तमानी केलेल्या चुकांचेही
ऐतिहासिक वर्म राहिले जातील
अन् पुरस्कारितांचे कार्य नव्हे
त्यांचे जाती-धर्म पाहिले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अप-प्रकारांत

Submitted by vishal maske on 18 August, 2015 - 10:42

अप-प्रकारांत

महाराष्ट्र भुषणच्या विरोधार्थ
आक्रमक नशा चढू लागली
सामाजिक जल्लोशाऐवजी
सामाजिक तेढ वाढू लागली

वैचारिकता बाजुला आणि
जाती-पातीलाच थारा आहे
मात्र घडत्या अपप्रकारातुन
भावनीकतेचाच चुरा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - घडणार्‍या गोष्टींत

Submitted by vishal maske on 17 August, 2015 - 22:24

घडणार्‍या गोष्टींत

हव्या असलेल्या गोष्टींसह
नको त्याही गोष्टी असतात
हव्या,नको त्या गोष्टींसाठी
पुन्हा-पुन्हा पुष्टी असतात

कुणी नटलेले असतात तर
कुणी मात्र तटलेले असतात
कित्येक घडणार्‍या गोष्टींमध्ये
दोन्ही नाट्य थाटलेले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जात

Submitted by vishal maske on 17 August, 2015 - 10:35

जात

जात पाहिली जाते इथे
धर्म पाहिला जातो आहे
माणसांमधला माणूस मात्र
माणूस आज विसरतो आहे

आज माणसांच्यासाठी इथे
माणूस "माणूस" होत नाही
अन् माणसांच्या जातीमधून
जात अजुनही जात नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

सदरील वात्रटिका ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

तडका - कायद्यात

Submitted by vishal maske on 17 August, 2015 - 00:03

कायद्यात

कितीही बदलु द्या वेश
स्वत:चे बदलु द्या नाव
चोर झाला साव तरिही
कायद्यापुढे ना धाव

उफाळ्या मारून मारून
कुणी पडले जरी गपगार
तरी कायद्यातुन कदापीही
सुटणार नाही गुन्हेगार,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - उंची

Submitted by vishal maske on 16 August, 2015 - 21:51

उंची

कधी प्रांजळ मनानं तर
कधी कपटी धोरण असतं
कुणाच्या खच्चीकरणासाठी
कुणाचं उंचीकरण असतं

एकमेकांची उंची गाठण्याची
एकमेकांमध्ये चुरस असते
मात्र वाढवलेल्या उंचीपेक्षा
वाढलेली उंची सरस असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दुष्काळात...

Submitted by vishal maske on 16 August, 2015 - 11:04

दुष्काळात,...

पाऊस-पाऊस करता-करता
पावसाळा कोरडा-ठाक आहे
होरपळतोय हा निसर्ग तरीही
का पावसाची डोळेझाक आहे

या वाढत्या भीषण परिस्थितीने
उरात धसका भरू लागला
अन् दुष्काळी भागात पाऊसही
आता बोगस दौरे मारू लागला

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ये आझादी झूठी है,...?

Submitted by vishal maske on 15 August, 2015 - 21:28

ये आझादी झूठी है,...?

स्वातंत्र्याकडे पाहण्याच्याही
वैचारिकता भिन्न-भिन्न आहेत
स्वातंत्र्यात जगत असलो तरी
स्वतंत्र्यावरच प्रश्नचिन्ह आहेत

आधी बाहेरच्यांनी देश लुटला
आता म्हणे आपलेच लुटत आहेत
स्वातंत्र्यात जगुनही गरिब,कष्टकरी
पारतंत्र्यापरि फरफटत आहेत,...?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - दारिद्रयाची परिसिमा

Submitted by vishal maske on 15 August, 2015 - 10:31

दारिद्रयाची परिसिमा

गरीब आणि श्रीमंती मध्ये
स्वातंत्र्य सर्रास दुय्यम आहे,.?
स्वातंत्र्यात जगत असलो तरी
इथले दारिद्रय कायम आहे,.!

या समस्या लक्षात घेऊन
आता युक्ती चालवली पाहिजे
अन् दारीद्रयाची परिसिमाच
देशाबाहेर घालवली पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - प्रशासन