तडका - भविष्यात

Submitted by vishal maske on 18 August, 2015 - 22:12

भविष्यात

मना-मनात फोफावणार्‍या
प्रसिध्दीच्या भुका आहेत
जातीय सलोखा साधने या
लांच्छनास्पद चुका आहेत

वर्तमानी केलेल्या चुकांचेही
ऐतिहासिक वर्म राहिले जातील
अन् पुरस्कारितांचे कार्य नव्हे
त्यांचे जाती-धर्म पाहिले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users