प्रशासन

तडका - स्रीयांची सुरक्षितता,...?

Submitted by vishal maske on 29 August, 2015 - 11:09

स्रीयांची सुरक्षितता,...?

स्री-पुरूष समतेचे विचार
समाजातुन दुभंगले आहेत
अन्याय आणि अत्याचार
अजुनही ना थांबले आहेत

कित्तेक मना-मनात इथे
नैतिकता जणू खिन्न आहे
स्रियांच्या सुरक्षिततेवरती
अजुनही प्रश्नचिन्ह आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रक्षा बंधनाच्या निमित्ताने

Submitted by vishal maske on 28 August, 2015 - 21:44

रक्षा बंधनाच्या निमित्ताने

रक्षाबंधनाने समाज बदलेल
या आशेवर कदापी जाऊ नये
कुणीतरी रक्षण करील म्हणून
बहिणींनो हतबल राहू नये

स्वत:चं रक्षण करण्यासाठी
स्वत: दक्ष असायला पाहिजे
समाजाच्या बदलत्या दृष्टीवर
सदैव लक्ष असायला पाहिजे

रूढी परंपरांचे असे विधी
जरूर जरूर छंदले जावे
मात्र रासवटांच्या मनालाही
नैतिक बंधनं बांधले जावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - बदलत्या समाजात

Submitted by vishal maske on 28 August, 2015 - 10:32

बदलत्या समाजात

बदलत्या समाजाची धुरा
जमाजानं जाणायला हवी
पुरूषा बरोबर स्री सुध्दा
आता समान मानायला हवी

स्री-पुरूषांतील भेदाच्या भावना
समाजा बाहेरच गेल्या पाहिजेत
अन् स्वत:चं रक्षण करण्यासाठी
स्रीयाही सक्षम झाल्या पाहिजेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - लोकसंख्ये बाबत,...

Submitted by vishal maske on 27 August, 2015 - 20:44

लोकसंख्ये बाबत

लोकसंख्या खुप वाढते आहे
हि समस्या कॅपीटल आहे
लोकसंख्या वाढणे म्हणजे
विकासालाही झळ आहे

म्हणूनच कुटुंब नियोजन हे
प्रत्येक कुटूंबात घडले पाहिजे
दारिद्र्य वाढीचे मुख्य कारण
कुटूंबातुनच ना वाढले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - स्मार्ट सिटी करताना

Submitted by vishal maske on 27 August, 2015 - 11:39

स्मार्ट सिटी करताना

विकासा साठी प्राधान्यानं
शहरांकडे फोकस जातोय
स्मार्ट सिटीच्या चर्चेचाही
भरभराटीने विकास होतोय

शहरांचा विकास करण्या
जरूर कर्तव्यदक्ष असावं
पण जरा सरकार कडून
खेड्यांकडेही लक्ष असावं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ठिणगीवाली बात

Submitted by vishal maske on 26 August, 2015 - 11:51

ठिणगीवाली बात

कुणाला कमी जमजणे हा
पश्चातापी प्रकार होऊन जातो
अन् छोट्या-छोट्या गोष्टींचाही
भलामोठा अनुभव येऊन जातो

मोठ्या-मोठ्यांची मोठी बात
छोट्या गोष्टींवर अडकू शकते
अन् ठिणगीवाली बात सुध्दा
वनवा होऊन भडकू शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विकासाच्या समस्या

Submitted by vishal maske on 26 August, 2015 - 05:30

विकासाचा प्रश्न

हलक्या-फूलक्या कामांसाठी
अवजड बजेट देण्यात येतं
अवजड बजेट देऊन देखील
काम भ्रष्टाचाराच्या पाण्यात जातं

कित्तेक विकास कामांमधूनही
भ्रष्टांचाच विकास साधला जातो
अन् विकासाचा प्रश्न सातत्याने
समाजास वारंवार बाधला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - फिल्मवरचे जीवन

Submitted by vishal maske on 26 August, 2015 - 01:03

फिल्मवरचे जीवन

फिल्म बघता-बघता
फिल्मी वागू लागले
फिल्मी नशा बाळगत
फिल्मी जगु लागले

फिल्म बघता-जगता कुठे
जीवनात फिल्मी ठेवण आहे
जीवनावरच्या फिल्म ऐवजी
जणू फिल्मवरचे जीवन आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कांदा खाण्यासाठी

Submitted by vishal maske on 25 August, 2015 - 07:47

कांदा खाण्यासाठी

हल्ली चर्चा-चर्चांना लागलेला
कांदा भाववाढीचा वास आहे
रोज कांदे खाणारांचाही आता
बिना कांद्याचाच घास आहे

वाढत्या भावामुळे कदाचित कांदे
दैनंदिन जेवनातुन हरवले जातील
अन् कांदा खाण्यासाठी मात्र
आठवडी दिवस ठरवले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गस्तवाले गावकरी

Submitted by vishal maske on 24 August, 2015 - 20:30

गस्तवाले गावकरी

दुष्काळाचे दिवस पाहता
अनुचित प्रकार घडू लागले
निद्रिस्त झाल्या गावांमध्ये
चोर्‍यांचे विकार वाढू लागले

वस्त्यांची राखण करण्यासाठी
आपसात बार्‍या पाडू लागले
गस्त घालुन-घालुन गावकरी
रात्र-रात्र जागून काढू लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - प्रशासन