टिका करताना
कधी कशी कोणावर करावी
याच्यासाठी शक्कल लागते
किती प्रमाणात केली जावी
याची सुध्दा अक्कल लागते
तेव्हाच आपण केलेली टिका
सुपर-डूप्पर घडू शकते
नाहितर कधी आपली बाजु
आपल्याच बोकांडी पडू शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आपण
कुणी-कुणी काय केले आहे
यावर सर्वांचा डोळा असतो
दुसर्यांच्या प्रत्येक कामाचा
आपल्या मनात ताळा असतो
पण आपण काय करायला हवे
आपल्या लक्षात आले पाहिजे
अन् आपण जे करू शकतो ते
आपणहूनच केले पाहिजे,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तंटा मुक्तीत
गावचे तंटे मिटवण्यासाठी
गाव सुध्दा सज्ज असावं
गाव-गावचं एकीकरणही
अगदीच अविभाज्य असावं
हेवे-देवे मनी बाळगत
एकमेकांना चिमटे नसावेत
तंटामुक्तीचा अध्यक्ष कोण,.?
याच मुद्यावर ना तंटे असावेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पोळा,...
दुष्काळानं होरपळलोय
ना पडला आहे पाऊस
चंगाळे,झूल,वारनेसची
कशी करावी हौस,...?
माझ्या परिस्थितीचा आढावा
बैलालाही कळला आहे
त्याच्यासह माझ्या मनाला
पोळा आज पोळला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पत्रास कारण की,...
पोशिंदाही पिचलाय आज
आमच्या मनात सल आहे
का जीव होतोय नकोसा
का मरण्या इतपत मजल आहे
तुम्ही अश्रु पुसु शकतात
याबद्दल मुळीच दुमत नाही
पण पत्रास कारण की,
आता बोलायची हिंमत नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शिकताना
शिकण्यासाठी खुप आहे
शिकणाराने जाणले पाहिजे
सदैव शिकण्याचे ध्येय
नसा-नसात भिनले पाहिजे
कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी
कधीच कुठलेही भय नसते
कधीही काहीही शिकू शकतो
शिकण्याला ठराविक वय नसते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
फूड रेशो
वेग-वेगळ्या विचारांची
वेग-वेगळी आखणी आहे
वैयक्तीक सवयींचीही
सामाजिक हाकणी आहे
काय खायला पाहिजे
काय खायचे नको आहे
वेग-वेगळ्या विचारांचा
वेग-वेगळा रेशो आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सल्ला महत्वाचा
काळ्या काळ्या ढगांनी
मनी हर्ष दाटत आहेत
थेंब-थेंब पावसाचेही
जनी जल वाटत आहेत
दुष्काळंच दाटलाय अजुनही
भविष्यात पाणी टिकलं पाहिजे
थेंब-थेंब पाणी वाचवुन वाचवुन
पाणी जपायला शिकलं पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
वास्तव
वेळीच करायच्या गोष्टी
योग्य वेळी होत नाहीत
सांगा आळशी पणाच्या
सवयी का जात नाहीत
कर्तव्य पार पाडताना
सदैवच दिरंगाई असते
पण बैल दुर जाताच
झोप्याचीही घाई असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कुंपण
शेताला कुंपण घातल्याने
शेताची चिंता मिटत नाही
वाढत्या नैतिक बदलांमुळे
आता सुरक्षित वाटत नाही
अनुभव येता समजेलंच
आम्ही अफवा वाटत नाही
सांगा कोण गँरंटी देईल
की कुंपण शेत लुटत नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३