प्रशासन

तडका - विरोध

Submitted by vishal maske on 8 October, 2015 - 00:55

विरोध

करता येतो म्हणून कधी
विरोध केला जात नाही
ज्याचे चरित्र चांगले आहे
त्याला विरोध होत नाही

स्वत: मध्ये बदल करण्यासाठी
स्वत:लाच शिकावं लागतं
आपला विरोध टाळण्यासाठी
चारित्र्य चांगलं राखावं लागतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - ऑनलाइन

Submitted by vishal maske on 6 October, 2015 - 23:16

ऑनलाइन

हल्ली वेग-वेगळ्या गोष्टींसाठी
ऑनलाइन महत्व वाढत आहे
कित्तेक कामांचा क्रियाकलाप
ऑनलाइन वरती नडत आहे

हव्या हव्या त्या गोष्टींसाठी
ऑनलाइन आधार घेतला जातो
तर कधी ऑनलाइन मधूनच
कुणाला गंडाही घातला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - त़ुर डाळ

Submitted by vishal maske on 6 October, 2015 - 11:59

तुर डाळ

पिकवणारे ठकलेत जणू
विकणारांचे फावले आहे
घरच्या मुर्गी पेक्षा जास्त
डाळीचे भाव धावले आहे

जुने अंदाज घेऊन-घेऊन
कुणी आता फसू लागेल
अन् रोजच्या जेवनात म्हणे
तुरडाळ तुरळक दिसु लागेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सल्ले

Submitted by vishal maske on 5 October, 2015 - 20:39

सल्ले

आपल्या कर्तव्याचा मुद्दा
कदाचित रांगु शकतो
कुणी काय करायला हवे
प्रत्येकजण सांगु शकतो

स्वत:पेक्षा दुसर्‍यांविषयी
वारंवारच कल्ले असतात
हवे नसलेले कधी-कधी
फूकटचे सल्ले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शेतकर्‍याचं जीणं

Submitted by vishal maske on 4 October, 2015 - 22:14

शेतकर्‍याचं जीणं

पाऊस नाही पडला तर
आत्महत्येनं मरतो आहे
तर पडत्या पावसात कधी
निसर्ग हत्या करतो आहे

का शेतकर्‍यांच्या नशिबी
हे संकटांचंच ठाणं आहे,.?
इकडे आड,तिकडे विहिर
हेच शेतकर्‍याचं जीणं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नाराज ऊसळी

Submitted by vishal maske on 3 October, 2015 - 21:52

नाराज ऊसळी

ज्याच्या त्याच्या नजरेमध्ये
ज्याची त्याची रडार असते
कधी अंतर्गत तर कधी-कधी
बाह्यरूपीही मदार असते

कधी युती जीगरबाज तर
कधी मात्र भेसळी असते
जिथे संधी मिळेल तेथुन
नाराजीची ऊसळी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - संप

Submitted by vishal maske on 3 October, 2015 - 09:19

संप

पशु-पक्षांच्या माना-पानाचं
रूढी-परंपरेत गूढ भासतं
पितृपाठाची सुरूवात होता
कावळ्यालाही महत्व आसतं

जर विचार करण्याची क्षमता
कावळ्यांनाही दिली असती
तर स्वत:ची किंमत कदाचित
त्यांनाही कळून आली असती

मागण्या कशा करायच्या हे
त्यांच्याही लक्षात आले असते
अन् वेग-वेगळ्या खाद्यासाठी
कावळ्यांनी संपही केले असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - जाहिराती मधून

Submitted by vishal maske on 2 October, 2015 - 20:28

जाहिराती मधून

लक्ष आकर्षीत करण्यासाठी
भलता आटा-पिटा असतो
पण त्याची पडताळणी हवी
किती खरा,किती खोटा असतो

देखीव पणात अविश्वासाची
सरळ डोळ्यात धूळ असते
कित्तेक जाहिरातीं मधून तर
केवळ दिशाभुल असते,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - पुन्हा एकदा

Submitted by vishal maske on 2 October, 2015 - 11:41

पुन्हा एकदा

प्रेमाचा विंचु चावल्या मुळे
कुणी पुरते घायाळही झाले
शिट्टी वाजल्याच्या संकेतांचे
कुणा मनी खयालही आले

शांताबायचा सामना करण्या
आनंदाचा धिंगाणा होऊ शकतो
अन् चिमणी उडताना भुर-भुर
पोपट पिसाटला जाऊ शकतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - समाजाची चुक

Submitted by vishal maske on 1 October, 2015 - 21:19

समाजाची चुक

सामाजिक ऐक्या ऐवजी
सामाजिक द्वेश पसरतात
जेव्हा नैतिक मुल्यांपासुन
माणसं खाली घसरतात

सामाजिक भावना भडकावणे
हि त्यांच्या मनाची भुक असते
पण त्यांची समाजात जोपासना
हि समाजाचीच चुक असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - प्रशासन