चौकशीत
ज्याला गुन्ह्याचा वास असतो
त्यावर आरोप केले जातात
जस-जसे पुरावे मिळतील
तसे हूरूपही आले जातात
दोषी किंवा निर्दोषत्वाचे
चौकशी अंती उलगडे असतात
मात्र चौकशीच्या वाटेमध्ये
पाय घालणारेही थोडे नसतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
बैमानीत
इतरांच्या दु:खातही लोक
स्वत:चं सुख शोधू लागतात
त्यांचे निर्दयी कृत्य कधी
ह्रदयालाच छेदू लागतात
माणूसपण विसरून सारं
माणसं जणू हैवान झालेत
मुर्दाड झालेत ह्रदय त्यांचे
जे मानवतेशी बैमान झालेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वागताना
कुणी कधी काय करावं
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो
पण यावर निर्बंध घालणे
हा कावा जहरी ढसणं असतो
जनता सहन करतेय म्हणून
हूकमी जगणं ना लादलं पाहिजे
अन् स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी
किमान नीयतीन वागलं पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
खरे देशद्रोही
संविधानिक अधिकार आहेत
जनतेमधून विरतीलंच कसे
मुलभुत हक्क बजावणारे
सांगा देशद्रोही ठरतीलंच कसे
कुणाच्या देशद्रोही संकल्पना
आमच्या मनी ना पटत आहेत
खरे देशद्रोही तर तेच आहेत
जे जे देशाला लुटत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
खरे देशद्रोही
संविधानिक अधिकार आहेत
जनतेमधून विरतीलंच कसे
मुलभुत हक्क बजावणारे
सांगा देशद्रोही ठरतीलंच कसे
कुणाच्या देशद्रोही संकल्पना
आमच्या मनी ना पटत आहेत
खरे देशद्रोही तर तेच आहेत
जे जे देशाला लुटत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
उघड-उघड सत्य
सत्य माहिती असतानाही
खोटे-खोटे दावे असतात
पण त्यांचे हे साटे-लोटे
जनतेलाही नवे नसतात
कितीही थापा मारल्या तरी
सत्य झाकता झाकत नाहीत
एवढं उघड-उघड असुनही
फेकु काहीच शिकत नाहीत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
स्रीया
महिलाही जाणू लागल्या
सामाजिक जबाबदार्या
चांगल्या समाज निर्मितीच्या
घेऊ लागल्या खबरदार्या
झपाट्याने होणार्या प्रगतीच्या
स्रीयाही कारण झाल्या आहेत
सत्कार्य करता-करता मात्र
कुकर्मातही पुढे आल्या आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
खंत
हातामध्ये पावर येताच
भले-भलेही फितुर झाले
मुलभुत हक्कही काढण्या
नको तितके चतुर झाले
कटू नीतीचा वापर करून
अधिकारही हिरावले गेलेत
त्यांच्या एका-एका कृत्याने
माणसं सुध्दा दुरावले गेलेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
आपल्या विचारांत
विचारांनी विचार जोडता
जणू वैचारिक उधाण होते
पण विचार कोणते जोडावे
यावर कुणी अजाण राहते
विवेकी विचारांची आपल्या
विचारांनाही संगत द्यावी
अन् अविवेकी काया ही
समाजातुन भंगत जावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
देखाव्यात
प्रत्येक गोष्ट वरचड हवी
ऐपत सुध्दा नसताना
आतुन पोकळ असुनही
फूगीर बनतात दिसताना
ज्या-त्या गोष्टी योग्य वेळी
योग्य ठिकाणी रोखाव्यात
इतिहास सुध्दा पहा जरासा
कित्तेक बुडाले देखाव्यात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३