प्रशासन

तडका - लोकशाहीच्या सक्षमतेला

Submitted by vishal maske on 20 September, 2015 - 11:28

लोकशाहीच्या सक्षमतेला

कीतीही मारू द्या थापा
कुणाकडेच स्वबळ नाही
लोक सहभागा शिवाय
लोकशाही प्रबळ नाही

लोकशाहीतील लोकांचं महत्व
लोकांना समजुन दिले पाहिजे
अन् लोकशाहीच्या सक्षमतेला
लोकांनी जागृत झाले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शाब्दिक वॉर

Submitted by vishal maske on 19 September, 2015 - 21:05

शाब्दिक वॉर

कधी आतल्या कडून तर
कधी मात्र बाहेरच्या कडून
कधी-कधी उघड-उघड
कधी मात्र शब्दांत दडून

शाली मधूनही जोडे देत
मनाचे सुरंग छेडले जातात
अन् टोलेजंग टोले देत
शाब्दिक वॉर लढले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - मागणीचे मुहूर्त

Submitted by vishal maske on 19 September, 2015 - 10:31

मागणीचे मुहूर्त

कधी कोणती मागणी करावी
कित्तेक मनात आखणी असते
योग्य मुहूर्त समोर दिसताच
लगेच मागणीची फेकणी असते

योग्य मुहूर्त भेटल्याने मग
संयमांना ना आळा असतो
अन् अटी-तटींच्या मुहूर्तांवर
सगळ्यांचाच डोळा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - स्वागत पावसाचे

Submitted by vishal maske on 18 September, 2015 - 21:10

स्वागत पावसाचे

दुष्काळलेल्या धरणीवरती
तो जोमा-जोमाने बरसला
तो क्षणही सुखावला मग
जो त्यासाठी होता तरसला

पडल्या दमदार पावसामुळे
मनी आशा चुकचुकली आहे
पावसाचे स्वागत करण्याला
मानवजात उत्सुकली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - माणसं

Submitted by vishal maske on 18 September, 2015 - 10:26

माणसं

कधी कधी लोकांसाठी
इथे मरतात माणसं
तर कधी कुणासाठी
कुणा मारतात माणसं

माणसांच्याच कुकर्मात
सांगा का खपावे माणसं,.?
माणसांकडून माणसांसाठी
माणसांनीच जपावे माणसं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - लाचखोरी

Submitted by vishal maske on 17 September, 2015 - 20:16

लाचखोरी

प्रगत होणार्‍या समाजाचे
पाळे-मुळे शोषलेले आहेत
कित्तेक मोक्याच्या ठिकाणी
लाचखाऊ बसलेले आहेत

कितीही नाही म्हटलं तरी
त्यांच्या नैतिकतेत दुरी आहे
स्वार्थी मनात फोफावलेली
सर्रास लाचखोरी आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निशाणा

Submitted by vishal maske on 16 September, 2015 - 21:04

निशाणा

कधी सरळ-सरळ
कधी वाकडा-तिकडा
कधी भरभरून तर
कधी मात्र तोकडा

जसे विचार असतील
तसा वैचारिक बाणा
प्रत्येकाच्या नजरेतुन
वेग-वेगळा निशाणा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निर्णय

Submitted by vishal maske on 16 September, 2015 - 09:24

निर्णय

कधी निर्णय योग्य असतात
कधी निर्णय गैर असतात
कधी सापन्नभावी तर
कधी भलतेच स्वैर असतात

काळ,वेळ अन् नियम पाहून
आपले निर्णय घेतले पाहिजेत
आपण घेतलेले निर्णय हे
इतरांनाही पटले पाहिजेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा

Submitted by vishal maske on 15 September, 2015 - 10:00

गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा

वेग-वेगळ्या संबंधांचेही
वेग-वेगळे ढगळे असतात
दाखवायचे दात वेगळे अन्
खायचे दात वेगळे असतात

कधी विरोध करता-करता
कधी-कधी दुजोरा असतो
गल्लीत गोंधळ करता-करता
दिल्लीत मात्र मुजरा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आंदोलनीय भाषा

Submitted by vishal maske on 14 September, 2015 - 20:38

आंदोलनीय भाषा

सामाजिक संघर्षाचे लकब
वारसाप्रमाणे ओढले जातात
वेग-वेगळ्या मागण्यांसाठी
आंदोलनंही छेडले जातात

आपले म्हणणे समजुन घ्यावे
एवढीच त्यातील आशा असते
कधी सौम्य तर कधी उग्र
आंदोलनीय भाषा असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - प्रशासन