नाते आपुलकीचे
आपुलकी अन् प्रेमाची गरज
खरं तर कुणालाही भासते
आपल्या लोकांची आपुलकी
प्रत्येकच मनालाही आसते
कधी नाते जवळचे तर
कधी नाते रापले दिसतात
पण कितीही दुर असले तरीही
आपले ते आपले असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
अंधार्या वस्तीत
डोळेही दिपु लागतात
विजेची वाट पाहून-पाहून
अपेक्षाही थकु लागतात
प्रतिक्षेमध्ये राहून-राहून
तर्क-वितर्कांचे आता
एकेक कारणे आठवा
दुसरी अपेक्षा नाही पण
थोडीशी लाइट पाठवा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
संघटनांचे फायदे
सामाजिक ऐक्या साठीच
सांघटनिक आखणी हवी
जाती-धर्मांच्या विषमतेवर
वैचारिक झाकणी असावी
सामाजिक समानतेचे धडे
जेव्हा संघटना देऊ लागतील
तेव्हाच संघटनांचे फायदेही
समाजाला होऊ लागतील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जीवनात
कधी कुठे काय करावं हे
विचारांवर अवलंबुन असतं
कुणाच्या विचारांमधून तर
नौटंकीपणही ओथंबुन जातं
मात्र हे अनुभवाचं ज्ञानही
अनुभवल्या विना कळत नाही
जीवन हा रंगमंच असला तरी
इथे वन्स मोअर मिळत नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
पावर दाखवताना
दाखवायचे दात वेगळे अन्
खायचे दात वेगळे आहेत
पण त्यांचे दिखाऊ दातही
खायच्या दातांनी डागले आहेत
खोटी बाजु समोर ठेवुन
खरी बाजु लपवली जाते
जनतेला भुलवुन-भुलवुन
स्वत:ची पावर दाखवली जाते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
डेली रूटींग
त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात
कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
गणपती
गणपती ऊत्सवाचा क्षण
सालाबादाने घडून येतो
अन् दहा दिवसांचा पाहूणा
पुन्हा-पुन्हा सोडून जातो
पुढच्या वर्षीचं निमंत्रणही
त्याला आठवणीनं दिलं जातं
अन् गणपती जाण्याचं दु:ख
आनंदाने साजरं केलं जातं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
टोल
टोल बंदच्या मागणीत
हेच तर पुढे-पुढे होते
पुढाकार घेत-घेत
तळमळीचे राडे होते
पण चित्र पालटले अन्
तेच सत्तेत बसले आहेत
विसंबुन बसलेले त्यांच्यावर
टोल बाबतीत फसले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
सुरक्षा रक्षकांची सुरक्षा
सामाजिक सुव्यवस्थेसाठी
रातंदिस राबतात पोलिस
म्हणूनंच तर रासवटांकडून
ते धरले जातात ओलिस
माणसंच झालेत बैमान
हिंसानियत डोक्यात आहे
सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा
आजकाल धोक्यात आहे,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
दोष
कुणी काय करायला हवे,.?
न करणारे सांगत असतात
मात्र इतरांना सांगत असता
स्वत:चे प्रश्न रांगत असतात
निसंकोच सांगावे इतरांना
पण आपले ना राहून जावे
इतरांना दोष देण्याआधी
आपणंच आपले पाहून घ्यावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३