तमाम गुरू जनांस
स्वत:च्या विसरून वेदना
ज्ञान वाटलंय तुम्ही
प्रगतीच्या उत्कर्षाचे
जग थाटलंय तुम्ही
आज बुध्दीच्या जोरावरच
समाज सारा जोमानं स्फूरतो
तमाम गुरू जनांस मी
शतश: शाब्दिक प्रणाम करतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
दुष्काळी परिस्थितीत
जे अनुभवत असतात
त्यांनाच तर कळतो
जीवघेणा दुष्काळ हा
किती-किती छळतो
परिस्थितीचे भान ठेवुन
माणूसकीचा फिरवा वारा
दुष्काळी या परिस्थितीत
एकमेकांस सहाय्य करा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
वागणे माणसांचे
नैसर्गिक असली तरीही
अनैसर्गिकता वाढत आहे
माणसांतली माणूसकीही
माणूसच तर तोडत आहे
विश्वासाचे नाते देखील
विश्वासबाह्य वागु लागलेत
माणसांच्या वागण्यालाही
माणसंच त्रागु लागलेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
दुष्काळी दौरे
कुणी समर्थन करतील
कुणी विरोध करतील
कुणी दुष्काळी दौर्यावर
वादंगी बारूद भरतील
ज्याच्या त्याच्या नजरेमधून
नव-नवे वारे वाहिले जातील
अन् वेग-वेगळ्या विचारांनुसार
दुष्काळी दौरे पाहिले जातील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मानसांनी
माणसांच्या मनात इथे
माणसांची तेढ आहे
माणसांशी झूंजण्याचे
माणसांना वेड आहे
माणसांच्या मनामध्ये
माणूसकी कृपावी
माणसांनी माणसांशी
माणूसकी जपावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
माणसांनो
माणसांच्या झूंडीत या
आज माणूस शोधतो मी
माणसांच्या वागण्यातुन
आज माणूस बोधतो मी
रासवी विचारांचे कधीही
ना कुणालाही फूस द्यावे
अन् माणसांशी वागताना
माणसांनी माणूस व्हावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के" यांची दुष्काळी दौर्याच्या निमित्ताने दुष्काळग्रस्तांच्या भावना प्रखरपणे मांडणारी हि एक वात्रटिका,...
******* तडका-९९९ *****
भावना दुष्काळग्रस्तांच्या,...
काळी माय बी तडफतीया
मनं आमचे होरपळले आहेत
शेतामध्येही फिरून पहा
फडच्या फड वाळले आहेत
शेतात जायची हिंमत नाही
घरातल्या घरात वागतो आहोत
मरण दारात येऊन थांबलंय
मरणाच्या दारात जगतो आहोत
आग पडली काळजात साहेब
उमेदही आचक्या देती आहे
जगणं कुठवर पुरणार आमचं
आमच्याच मनाला भीती आहे
मरत मरत जगतो आहोत
पण जनावरांना पोसावं कसं
त्यांनीच आजवर पोसलंय आम्हा
आता आम्ही गप्प बसावं कसं
विचारवंत मारणारांनो
विचारवंत मारण्यासाठी
फूसके ठूसके वार असतात
अविचारी माणसांकडूनच
भ्याड गोळीबार असतात
विचावंत मारण्या आधी
विचार त्यांचे वाचुन पहा
जे दुष्कृत्य करत आहात
त्याला स्वत: टोचुन पहा
तुमच्यातील अविवेकाला
विवेकाने विराम कराल
विचारवंतांच्या विचारांना
सदैव तुम्ही सलाम कराल
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विचार विचारवंतांचे
पुरोगामित्वाचा विचार
समाजात पटत जातो
मारल्यानंही मरत नाही
तो जास्तच पेटत जातो
विचारवंत मरतील कदाचित
विचार मात्र जिवंत राहतील
क्रांतीकारकांचे कार्य देखील
त्रिकालबाधित ज्वलंत राहतील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
प्रॉपर्टी
ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे
त्याला त्याची किंमत कळते
कित्तेक कित्तेक कामांसाठी
प्रॉपर्टीनेच तर हिंमत मिळते
स्वाभिमानाची मनामध्ये
प्रॉपर्टी ताकत भरू शकते
तर कधी आपलीच प्रॉपर्टी
आपल्याला घातक ठरू शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३