पाण्याचे स्थलांतर
इकडचे तिकडे गेले पाहिजे
तिकडचे इकडे आले पाहिजे
किमान दुष्काळी परिस्थितीत
पाण्याचे स्थलांतर झाले पाहिजे
मात्र माणसांच्याच मदतीसाठी
माणसांचे माणूसपण कडवे होते
अन् पाण्याच्या स्थलांतरासही
प्रांतीय आकुंचन आडवे येते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कांद्याच्या धंद्यात
कांद्याचा तुटवडा भासताच
व्यापार्यांनी भाव वाढवले
ज्यांनी कांद्याला घडवले
कांद्याने त्यांनाही रडवले
व्यापारी मित्रांनाही कांदा
शेतकर्यांनीच पुरवला आहे
मात्र या कांद्याच्या धंद्यामधून
शेतकरी जणू हरवला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कांद्याचा भाव,...
ज्यांनी पिकवले कांदे
त्यांचेच झालेत वांदे
तरीही जोरात आहेत
इथे कांद्याचेच धंदे
कांद्याची झालेली भाववाढ
हा कटू नीतीचा डाव आहे
ज्यांनी कांदे पिकवले नाही
त्यांच्याच कांद्याला भाव आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सरकारी हातभार
होरपळतोय हा महाराष्ट्र
तरीही सरकार गप्प आहे
शेतकरी आत्महत्या करतोय
सरकारची भुमिका ठप्प आहे
आणीबाणी ओळखुन घेऊन
कर्तव्यदक्ष व्हायला पाहिजे
मोडत्या संसारांना शेतकर्यांच्या
सरकारने हातभार लावायला पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
यश मिळवताना
यश मिळवायचं असेल तर
प्रयत्न हे करावे लागतात
ध्येयपुर्तीचे ध्येय वेडे
मनामध्ये भरावे लागतात
ध्येयही त्यांचेच पुर्ण होतात
ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते
मात्र इच्छा हिन माणसांकडून
उदासिनतेचीच खळबळ असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मोदी साहेब,...!!!!
बिहारच्या निवडणूका आहेत
म्हणून तुम्ही त्यांना पॅकेज दिलं
आमचा मुळीच याला विरोध नाही पण
सांगा आम्ही तुमचं काय नुकसान केलं,.?
द्यायचं होतं आम्हालाही पॅकेज एक
खरंच झाले असते शेतकरी खुश
तोडले असते गळ्याचेही फास
अन् त्यागलं असतं पिण्याचं विष
तुमचा अच्छे दिनचा नारा साहेब
शेतकरी अजुन ना विसरले आहेत
पण आता कळेनासंच झालंय की
अच्छे दिन कुणाला आले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शेतकरी राजा
रोज-रोज खचतो आहे
नशिबालाच दोष देऊन
कुणी मरतो फास घेऊन
कुणी मरतो विष पिऊन
खचला आहेस तरी राजा
मरण स्वस्त करू नको
जगुन दाखव हिंमतीनंच
आत्महत्येनं मरू नको
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
खिल्ली
प्रत्येकाच्या मनात स्वतंत्र अशी
द्वेशा-भावांची गल्ली असते
कधी गंभीर,कधी मिश्किल
कधी मुश्कील खिल्ली असते
खिल्ली कशी कोणाची उडवावी
याचीही भली दांडगी कला असते
तर आपण उडवलेली खिल्ली ही
कधी आपल्यासाठीच बला असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विचार
वैचारिक क्रांती करण्यासाठी
वैचारिकतेचाच लढा असतो
पुरोगामी विचार मांडताना
प्रतिगामित्वाला तडा असतो
म्हणूनच रासवटांकडून तो
घाता-पाताने लढला जातो
पण विचार हा मरत नसतो
तो जोमा-जोमाने वाढला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
निष्कर्ष
कुणाच्या भावना आनंदल्या
कुणाच्या भावना कुस्करल्या
'महाराष्ट्र भुषण' वितरणाने
चर्चा जास्तच विस्फारल्या
वादावर पडदा टाकला तरी
पडद्याच्या आत परामर्श होतील
अन् वेग-वेगळ्या चर्चे मधून
वेग-वेगळे निष्कर्ष येतील
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३