Submitted by vishal maske on 21 August, 2015 - 20:59
मोदी साहेब,...!!!!
बिहारच्या निवडणूका आहेत
म्हणून तुम्ही त्यांना पॅकेज दिलं
आमचा मुळीच याला विरोध नाही पण
सांगा आम्ही तुमचं काय नुकसान केलं,.?
द्यायचं होतं आम्हालाही पॅकेज एक
खरंच झाले असते शेतकरी खुश
तोडले असते गळ्याचेही फास
अन् त्यागलं असतं पिण्याचं विष
तुमचा अच्छे दिनचा नारा साहेब
शेतकरी अजुन ना विसरले आहेत
पण आता कळेनासंच झालंय की
अच्छे दिन कुणाला आले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
है शाब्बास! तडका आवडला.
है शाब्बास!
तडका आवडला.
सुंदर.
सुंदर.
यांना फक्त जुमला करायला जमते
यांना फक्त जुमला करायला जमते आणि विदेशी फिरायला. बाकी काम करणे यांच्या जीवावर येते
जबरदस्त तडका
जबरदस्त तडका
छान!
छान!
छान!
छान!
मोदिंचा 'तडका' देउनही या
मोदिंचा 'तडका' देउनही या कवितेला प्रतिसाद मिळेनासे झालेत.
याचे काय कारण असावे बरे.
तडका खुप सुंदर रचना.
तडका खुप सुंदर रचना.
तडका खरोखर आवडला. चूक केलीय
तडका खरोखर आवडला. चूक केलीय ना त्यानी? चूक सुधारायला पाहीजे होती. पण महाराष्ट्र सरकारने पण याची तड लावुन धरायला पाहीजे होती. सन्धी मिळाली तर सोने करायला हवे. खरच आश्चर्य वाटले मला केन्द्र सरकारचे.
मोदिंचा 'तडका' देउनही या
मोदिंचा 'तडका' देउनही या कवितेला प्रतिसाद मिळेनासे झालेत. > सगळीकडेच मोदींना लोकप्रियता मिळेल असे नाही कुठे कुठे दिल्ली सारखे देखील होते