तडका - गस्तवाले गावकरी

Submitted by vishal maske on 24 August, 2015 - 20:30

गस्तवाले गावकरी

दुष्काळाचे दिवस पाहता
अनुचित प्रकार घडू लागले
निद्रिस्त झाल्या गावांमध्ये
चोर्‍यांचे विकार वाढू लागले

वस्त्यांची राखण करण्यासाठी
आपसात बार्‍या पाडू लागले
गस्त घालुन-घालुन गावकरी
रात्र-रात्र जागून काढू लागले

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users