तडका - कलामजी

Submitted by vishal maske on 28 July, 2015 - 10:25

कलामजी,...

वर्तमान घडवता-घडवताना
भविष्यकाळही घडवला आहे
तुमच्या एका-एका आठवणीने
अख्खा भारत रडवला आहे

तुम्ही बांधलेल्या धोरणांमध्ये
परिस्थिती आजही गुलाम आहे
कालही तुम्हाला सलाम होता
आजही तुम्हाला सलाम आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवीमहोदय

तुम्ही बांधलेल्या धोरणांमध्ये
परिस्थिती आजही गुलाम आहे

याचा अर्थ माझ्या क्षुद्र आकलनशक्ती च्या पलिकडे आहे. आपण त्याचं निरुपण करण्याची कृपा व्हावी.
आपणास मजकडून त्रास होत असल्यास क्षमा असावी.

ख.सा.
अगदी अगदी...माझ्या मनातला प्रश्न Wink
तुम्ही बांधलेल्या धोरणांमध्ये
परिस्थिती आजही गुलाम आहे...मी पण ह्या ओळी वाचुन त्या ३ इडीयट्स मधल्या प्रोफेसर सारखेच विचार्णार होतो..."भाई केहना क्या चाहते हो" Lol