पुण्यतील एका मुलाने एम पी एस सी ची लेखी परिक्षा पास होऊनही दोन वर्षे मुलाखतीचा कॉल न आल्याने निराश होउन आत्महत्या केली. त्या घटनेचे बरेच पडसादही उमटले. एमपीएससी च्या रिकाम्या जागा ३१ जुलै पर्यंत भरणार ! अशी गर्जना मंत्रीमहोदयांनी केली. पण एक लबाडी होतीच, या जागा म्हणजे एमपीएससी चे पाच सभासद असतात व एकावरच गाडा हाकला जात होता, त्या उरलेल्या चार होत्या, उमेदवाराच्या नव्हेत. अर्थात हेही आश्वासन ३१ जुलै पर्यंत पाळता आले नाही. या एकूण दु:खद घटनेमुळे मनात आलेले काही विचार सैर भैर लिहित आहे.
उदविग्न मनाचा उद्रेक...
होईल आता उदविग्न मनाच्या संतापाचा उद्रेक...
घडले नाही कधी असा घडवेल एल्गार अनेक...
मिटलेल्या मुठीमध्ये, तुटलेली स्वप्ने घेऊन अनेक...
न्याय निवाडा उरला नाही, शोधी संघर्षाची मार्गे अनेक...
अनेक मिटले, मिटतील अनेक मृगजळ समान न्यायातून...
उरलेले मरतील भूक, द्वद्व, अन कोल्हेकुई समाज विवंचनेतून...
त्याच अंधारातून पुन्हा प्रकाश निघेल एक...
न्यायामागच्या अन्यायाला फाडतील किरणे अनेक...
मागून मिळत नसेल तर तो मिळवावाच लागतो...
संघर्षासाठी एक वेळ शस्त्र हातात घ्यावाच लागतो...
Reflecting on the recent break-in at the US Capitol by Trump supporters consumed by the false narrative of the last election wrote my first ever gazal with context/meaning in english. _/\_
[1]
मायावी भ्रमांचे गुंतती जाळे
शुभ्रते सत्यही रंगती काळे
[2]
अज्ञानी झिंगुनी घरी स्वतःच्या
म्हणवुनि वीर खंडती ताळे
[3]
काजळी दिव्याते झाकली अशी
उजेडी अंधार वंदती कुळे
[4]
असत्ये झाकले पूर्णते असे
मध्यांन्नी पौर्णिमा सांगती खुळे
[5]
अंधार पाजळे दिव्याशी इथे
सूर्यास काजवे संतती मिळे
नमस्कार,
मायबोलीवर असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रीणीना विजयादशमी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही कामना.
मी मागे लिहिलं तसं आमच्या प्रोजेक्ट चे काम जोरात सुरू आहे. KRARERISS ची सर्व कागद पत्रे सरकारी कचेरीत जमा केलेली आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स लवकरच प्रमाणपत्र देईल हे ही नक्कीच.
आत्ता या क्षणी लगेचच "पुन्हा नव्याने सुरवात" शक्य आहे का ?हो,आहे तर आणि ती व्यवहार्य तर आहेच आणि अपरिहार्य सुध्दा.हीच भावना जनमानसात रुजवण्यासाठी "पुनश्च हरिओम" ही चार भागांची लेखनमाला सादर करत आहे.
कोरेनाच्या संकटामुळे भयग्रस्त झालेल्या माणसांनी शहरे सोडून गावाकडे स्थलांतर सुरू केले आहे. हे चित्र खूपच केविलवाणे आणि भयप्रद आहे. माणसांमाणसांमधील शारीरिक अंतर वाढविणे ही सध्याची अपरिहार्यता असली तरी मनामनांतही अंतरच नव्हे, तर दरी माजेल असे चित्र कुठेकुठे उमटू पहात आहे. ही दरी वेळीच बुजवायला हवी. आसऱ्याच्या ओढीने वणवण करणारी माणसेच आहेत आणि केवळ अनाकलनीय परिस्थितीमुळे त्यांच्यावर ही वेळ ओढवली आहे. त्यामुळे, कोणताही दोष नसताना केवळ संकटापासून स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या या केलिलवाण्या स्थितीत त्यांना आधार देण्याची गरज आहे.
राजकीय नेत्यांनी कोणत्या प्रसंगी काय बोलावे, संभ्रमात भर पडेल असे बालणे टाळण्याचे भान ठेवावे, ही समज जागी करण्याची गरज आहे. अशा वेळी, वाजपेयी आठवतात!
***