राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस कामकाजाचे करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे तमाम कर्मचारीवर्ग कमालीचा खुश झालाही असेल, पण सर्वसामान्य माणसावर मात्र धास्तावण्याचीच वेळ येणार आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार-रविवार पूर्ण सुट्टीचा असतो, त्यामुळे अन्य रविवार वगळता आठवड्यातील इतर दिवस पूर्ण कामकाजाचे असतात अशी जनतेची एक अंधश्रद्धा असल्याने कामकाजाच्या दिवशी सरकारी कार्यालयांत खेटे घालणाऱ्यांना सरकारी कामाच्या गतिमानतेची पूरण कल्पना अगोदरपासूनच आहे.
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!
२०१६ सालच्या सरकारी अध्यादेशात महाराष्ट्रातील किल्ले भाडेतत्त्वावर देणे, तिथे लग्न समारंभास परवानगी देणे याबद्दल उल्लेख आहे. आज तीन वर्षांनी भाजप सरकारने २५ किल्ल्यांवर सदर योजना राबविण्यासाठी निवड केली आहे अशी बातमी indian express आणि इतर वृत्तपत्रात आलेली आहे.
भारत-पाकिस्तान स्वातंत्र्याची ७३ वर्षे
ऐकून इम्रानच्या वल्गना
हिंदुस्तानी झाले सॅड
बघून कर्तृत्व मोदीजींचे
पाकिस्तानी झाले मॅड!!
पाकिस्तान राहिलाय पीड़ित
बाळगून हिंदुस्थान द्वेषाचे फॅड,
७० वर्षे जनतेला बनवीत उल्लू
नेते मिळाले एकदम बॅड!!
अतिरेकी सापडो जगात कुठेही
निघतो फक्त पाकिस्तानी लॉन्च पॅडवरुन
अंतराळात उपग्रह जगातील कुणाचाही
झेपावतो फक्त हिंदुस्तानी लॉन्च पॅडवरुन!!
एकाला विकास आणि दुसऱ्याला ठेंगा
जमिनीतले पाणी संत्रा वाल्यांनी उपसले
कापूसवाले आभाळाला डोळे लावून बसले !
धरणातले पाणी ऊस द्राक्ष पिऊन गेले
पिण्याच्या पाण्याचे टँकर आत्ताच येऊन गेले !
बळी राजा देतो रोज स्वतःचाच बळी
इथे मात्र नोटा छापते उसाची मळी !
ऊस द्राक्ष केळी वाला कारीतनं फिरतो
कापूसवाला भाऊ का कर्ज मागत फिरतो?
कापूस देऊन शेतकरी पैशाची वाट बघत बसतो
ऊस द्राक्ष केळीवाला एसीत रोख मोजत असतो !
शेतीसाठी कर्ज देण्या बँका फितूर झाल्या
कारसाठी कर्ज देण्या मात्र आतुर झाल्या !
Nightmarch: Among India’s Revolutionary Guerrillas
by Alpa Shah
माओवादी म्हटले की गडचिरोली ते झारखंड या पट्ट्यात आदिवासी भागात होणारे हिंसक हल्ले बहुतेकांच्या डोळ्यासमोर येतील. उग्रवादी, दहशतवादी ही विशेषणे यांना लावली जातात. आजकाल अर्बन नक्षल ही संज्ञादेखील पॉप्युलर झाली आहे.
मात्र नक्षलींचे कार्य का टिकून आहे, कसे चालते, त्यांचे साधनसामुग्री तसेच मनुष्यबळाच्या रासदीचे मार्ग कोणते आणि मुख्य म्हणजे ही चळवळ का टिकून आहे याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल असेल.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
सध्या मायबोलीवर निरुद्देश आणि बिनकामाचे असे असंख्य धागे भारंभार निघत आहेत. पहिले पान तर अशाच धाग्यांनी भरून गेलेले दिसते. एका आयडीने तर कहर केला आहे. त्या आयडीचा एक विशिष्ट राग त्यातून लपून राहीलेला नाही.
अशा विकृत उद्दिष्टांसाठी मायबोलीला वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नये ही नम्र अपेक्षा आहे. या आधी जुने धागे जर एकाच आयडीमुळे वर आले ( मग ते चांगले का असेनात) तर त्या आयडीस यमसदनास पाठवण्याची कारवाई झालेली आहे. थोडक्यातच स्पॅम या प्रकाराबाबत पूर्वीप्रमाणे कारवाई व्हायला हवी अशी माझी तरी इच्छा आहे. या भावनेशी कोण कोण सहमत आहे ?
भारतातील प्रत्येक पक्षातिल नेते मऺडळी पद सत्ता आणि पैसा या तीन गोष्टी वापरून आपल्याच मुला वापर कुटुंबातील सदस्यांना आमदार खासदारांची उमेदवारी मिळवून देऊन सत्ता आपल्याच घरात ठेवून घराणेशाहीचा इतिहास घडवत आहेत याला कोणताही पक्ष अपवाद नाही त्यामुळे प्रश्न पडतो की या देशात लोकशाही आहे काॽ आपली मते सांगा , चर्चा अपेक्षित आहे प्रतिसाद द्यावा, ऺऺऺ