बिनकामाचे भारंभार धागे
Submitted by थॅनोस आपटे on 17 January, 2019 - 06:19
सध्या मायबोलीवर निरुद्देश आणि बिनकामाचे असे असंख्य धागे भारंभार निघत आहेत. पहिले पान तर अशाच धाग्यांनी भरून गेलेले दिसते. एका आयडीने तर कहर केला आहे. त्या आयडीचा एक विशिष्ट राग त्यातून लपून राहीलेला नाही.
अशा विकृत उद्दिष्टांसाठी मायबोलीला वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नये ही नम्र अपेक्षा आहे. या आधी जुने धागे जर एकाच आयडीमुळे वर आले ( मग ते चांगले का असेनात) तर त्या आयडीस यमसदनास पाठवण्याची कारवाई झालेली आहे. थोडक्यातच स्पॅम या प्रकाराबाबत पूर्वीप्रमाणे कारवाई व्हायला हवी अशी माझी तरी इच्छा आहे. या भावनेशी कोण कोण सहमत आहे ?
शब्दखुणा: