उदविग्न मनाचा उद्रेक...
Submitted by सुर्या--- on 23 April, 2021 - 00:22
उदविग्न मनाचा उद्रेक...
होईल आता उदविग्न मनाच्या संतापाचा उद्रेक...
घडले नाही कधी असा घडवेल एल्गार अनेक...
मिटलेल्या मुठीमध्ये, तुटलेली स्वप्ने घेऊन अनेक...
न्याय निवाडा उरला नाही, शोधी संघर्षाची मार्गे अनेक...
अनेक मिटले, मिटतील अनेक मृगजळ समान न्यायातून...
उरलेले मरतील भूक, द्वद्व, अन कोल्हेकुई समाज विवंचनेतून...
त्याच अंधारातून पुन्हा प्रकाश निघेल एक...
न्यायामागच्या अन्यायाला फाडतील किरणे अनेक...
मागून मिळत नसेल तर तो मिळवावाच लागतो...
संघर्षासाठी एक वेळ शस्त्र हातात घ्यावाच लागतो...