जेल
जेल - भाग दुसरा
सकाळचे सहा वाजले होते.. इन्सपेक्टर पवार आपल्या बेडरूममधे मस्त साखरझोप घेत होते इतक्यातच " सारे जहाॅ से अच्छा" अशी रिंगटोन असलेला त्यांचा मोबाईल वाजला
चरफडतच त्यांनी तो उचलला..भलीमोठी जांभई देत त्यांनी ओशाळून तो रिसीव्ह केला...
हॅलो...
"काय, कुठे?? येतोच मी तोपर्यंत तुम्ही जागेच बारकाईने निरीक्षण करा..एकही पुरावा हातातून सुटता कामा नये.."
इतकं बोलून ते घटनास्थळी निघण्याची तयारी करू लागले..
जेल - भाग पहिला
घुऽऽ... घुऽऽ... घुऽऽ.. घुऽऽ... कानाभोवती घोगंवणार्या डासांच्या आवाजाने ईस्माईलची झोप मोड झाली..
तशी त्याला एकदम अशी गाढ झोप लागली होती अशातला काही भाग नव्हता आणि तसेपण जेलमध्ये कुणाला सुखाची झोप लागतेय पण त्याचा डोळा लागला होता हे खरे..
ईस्माईलने वेळेचा अंदाज घेतला त्याच्या अंदाजाप्रमाणे रात्रीचे 11:30 तर नक्कीच वाजले असतील.. त्याने माठातले थंडगार पाणी प्यायले आणि पडल्या पडल्या तो विचार करू लागला...
त्याला कधी असे स्वप्नातही वाटले नव्हते की, ज्या जेलमध्ये तो आचारी म्हणून काम करत होता त्याच जेलच्या कारावासात त्याला असं निम्मं आयुष्य असं खितपत पडावं लागेल..
