उद्योजक व्हायचंय? इस्रोबरोबर व्यवसायाच्या संधी.
Submitted by एविता on 24 October, 2020 - 11:33
नमस्कार,
मायबोलीवर असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रीणीना विजयादशमी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही कामना.
मी मागे लिहिलं तसं आमच्या प्रोजेक्ट चे काम जोरात सुरू आहे. KRARERISS ची सर्व कागद पत्रे सरकारी कचेरीत जमा केलेली आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स लवकरच प्रमाणपत्र देईल हे ही नक्कीच.