नमस्कार,
मायबोलीवर असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रीणीना विजयादशमी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही कामना.
मी मागे लिहिलं तसं आमच्या प्रोजेक्ट चे काम जोरात सुरू आहे. KRARERISS ची सर्व कागद पत्रे सरकारी कचेरीत जमा केलेली आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स लवकरच प्रमाणपत्र देईल हे ही नक्कीच.
बऱ्याच लोकांनी ह्या कामात रस दाखवला आहे आणि उद्योजक बनण्यासाठी ही चांगली संधी आहे असेही बरेच जण म्हणत आहेत. हे नक्की काय आहे अशी ही विचारणा आमच्याकडे झाली. ह्याची थोडक्यात माहिती मी देत आहे. स्वतःचा उद्योग स्थापून चार लोकांना रोजगार द्यावा असं बऱ्याच लोकांना वाटत असतं त्यांच्यासाठी देखील याचा फायदा व्हावा.
२० ऑगस्टला इस्रोकडून आयोजित करण्यात आलेल्या 'अनलॉकिंग इंडियाज पोटेन्शिअल इन स्पेस सेक्टर' (Unlocking India's Potential in Space Sector) या वेबिनार मध्ये ज्यांनी भाग घेतला होता, त्यांना बरीच काही माहिती मिळाली असेलच.
"इस्रो" अवकाश संशोधनात आघाडीवर आहे आणि आपल्या भारतीयांना ती अभिमानाची बाब आहे. आजपर्यंत अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये ‘इस्रो’ने कार्टोसॅट, इन्सॅट, मंगलयान, चांद्रयान, ॲस्ट्रोसॅट असे महत्वाचे एकूण १०९ उपग्रह, स्वदेशी प्रक्षेपण वाहनांची निर्मिती आणि त्याद्वारे प्रक्षेपण, ३१९ परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण अशी भरीव कामगिरी केली आहे, ज्यामुळे आपली मान उंचावली आहे.
अवकाशक्षेत्र आता खाजगी उद्योगांसाठी खुले होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ह्या निर्णयाचे स्वागत करताना ह्याचे परिणाम सकारात्मक होणार असल्याने ते उत्साहवर्धक आहे. IN-SPACe (Indian National Space Promotion and Authorisation Centre) ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र’(आयएन-स्पेस) सुरू करायला मान्यता मिळाली असून ही ‘आयएन-स्पेस’ देशाच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये खासगी कंपन्यांना अवकाश उपक्रमात सहभागासाठी प्रोत्साहन देईल, मार्गदर्शन करेल.
‘इस्रो’ आणि खासगी उद्योग यांच्यातील दुवा म्हणून काम करताना ‘इस्रो’मधील साधनसुविधांचा समर्पक वापर करण्याकरीता गाईड लाईन्स तयार करणे आणि its implementation अशी कामे इन स्पेस करणार आहे. "इनस्पेस’सिंगल विंडो नोडल एजन्सी आहे. ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ, तांत्रिक माहिती, भांडवल, सामायिक साधन सुविधा, जागा, सामग्री, तंत्रज्ञान सुलभतेने आणि आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी ही नोडल एजन्सी काम करेल. ह्याचं नोडल एजन्सी कडे आम्ही गेलो आहे. एखाद्या कंपनीला मदत, आणि काय कौशल्य लागेल ते ठरवण्यासाठी प्रक्रिया निश्चित करण्याचे काम चालू आहे. उद्योजकांशी सुसंवादासाठी आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्रो-उद्योग इंटरफेस यंत्रणा स्थापित झालेली आहे. उद्योजक इस्रोला हवी तशी क्वालिटी देऊ शकतील का याची पडताळणी, डॉक्युमेंटेशन, टेस्टिंग प्रोसिजर, इन्स्पेक्शन, क्वालिटी कंट्रोल, अपग्रेडींग ऑफ टेक्नॉलॉजी वगैरे साठीही ही नोडल एजन्सी मदत करेल. तंत्रज्ञानातील नवीन प्रक्रियांसाठी प्रपोजल मागितले जातील. या सगळ्यांमध्ये खूप मोठा डेटाबेस हाताळणे आणि त्याचे निष्कर्ष वेळेत देणे महत्त्वाचे असल्याने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेल, प्रोग्रामिंग यांचा वाटा कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक प्रणाली तयार करणाऱ्या कंपन्या आणि तज्ज्ञ आहेत त्यांचा उपयोग होऊ शकतो. चांगल्या प्रपोजलना सरकारकडून काही प्रमाणात निधीही मिळेल. खासगी उद्योगांना अशा तऱ्हेने शोध मोहिमेमध्ये भाग घेता येईल.
अवकाश संशोधन बाजार जवळ जवळ साडेतीनशे अब्ज डॉलर्स इतके प्रचंड आणि भारतीय मार्केट शेअर फक्त ३% आहे. यामध्ये उपग्रह प्रक्षेपणामध्ये २%, तर उपग्रह-आधारित सेवा आणि ग्राउंड-बेस्ड सिस्टमसारखे कार्यक्रम १% आहेत. ‘अँट्रिक्स’ ही कंपनी ‘इस्रो’च्या व्यावसायिक उपक्रमांची देखभाल जरी करत असली तरीही व्यावसायिक उलाढाल फारच नगण्य आहे. मार्च २०१९ रोजी ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ (एनएसआयएल) ही कंपनी सुरु केलेली असून ‘इस्त्रो’ची ती व्यावसायिक शाखा आहे.
इस्रोचे खाजगीकरण होणार आहे अशा चर्चा बऱ्याच काळ चालत होत्या परंतु आता तसे काहीच होणार नाही, पण खासगी कंपन्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं आणि त्यामुळे तंत्रज्ञान विकास आणि क्षमता विस्तार होऊ शकेल, असं इस्रोचे चेअरमन के सिवन म्हणाले होतेच त्या प्रमाणे खासगी कंपन्या इस्रोसोबत अंतराळ मोहिमांत भाग घेतील परंतु मुख्य काम इस्रो आणि त्याचे वैज्ञानिकच करतील असं ही ते म्हणाले.
इस्रो आता सध्या रॉकेट आणि सॅटेलाईट बनवण्यात सक्षम आहे. अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्याच्या त्यांनी केलेल्या घोषणे नंतर खासगी कंपन्याही अशी साधनं बनवण्यात मदत करतील. त्यामुळे जास्तीत जास्त सॅटेलाईट अवकाशात सोडता येतील, असंही के. सिवन यांनी म्हटलं. खासगी क्षेत्राला अंतराळात रॉकेट, उपग्रह निर्माण आणि प्रक्षेपण सेवा देण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. अमेरिका आणि युरोप मधील काही देशांमध्ये खासगी कंपन्यांचा सहभाग पूर्वीपासून आहे.
आता जो उद्योग आपण स्थापन करू शकतो अशा खासगी उद्योगांना प्रोत्साहन ‘न्यूस्पेस इंडिया’तर्फे मिळेल. अवकाश उद्योगांचा आवाका खूप मोठा आहे. उपग्रह, उपग्रह समूह आणि रॉकेट्स सोडणे, प्रक्षेपक तयार करणे याशिवाय अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये हवामानाचा अचूक अंदाज, दळणवळण, विमानांचे उड्डाण, ऊर्जा, पर्यावरण, शेती, भूगर्भातील आणि जमिनीवरील पाण्याचे आणि नद्यांचे मोजमाप/नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, अनेक आपत्तींचा अंदाज आणि आपत्तीनिवारण, इ-गव्हर्नन्स, शहरे आणि ग्रामीण भागाचे नियोजन, पर्यावरण आणि प्रदूषण, स्मार्ट शहरांचे नियोजन, मासेमारी, समुद्राचा अभ्यास आणि ब्ल्यू इकॉनॉमी, अवकाश प्रक्षेपण आणि उपग्रह यासाठीची अवजारे, यंत्रे, संवेदके आणि प्रोग्रामिंग बनवताना वापरलेल्या अनेक नावीन्यपूर्ण पॉलिमर्स, वजनाने हलके मटेरिअल्स, तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर, दळणवळण, हवामान, संरक्षण आणि अगदी शहरी विकासापर्यंत जवळपास प्रत्येक क्षेत्राला त्यांचे भविष्यातले धोरण आणि व्यवसाय वाढवण्यासाठी उपग्रह डाटा, प्रतिमा आणि अवकाश तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. भारतातील वाढती मागणी आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ‘इस्रो’ला सध्याचे आकारमान आणि काम किमान दहापट वाढवावे लागेल. जगभरातील बऱ्याच खासगी कंपन्या हवामान आणि संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित करण्यामध्ये आणि त्याद्वारे उपलब्ध माहितीचा वापर करण्यात व्यग्र आहेत. आपल्या देशात खासगी कंपन्यांनी या उपक्रमांचा ताबा घेतला, तर ‘इस्रो’सारख्या संस्था वैज्ञानिक अभियान राबवून अवकाश संशोधनावर जास्त लक्ष केंद्रीत करतील. ‘इस्त्रो’ संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि विकास उपक्रम, शोध मोहीम आणि मानवी अंतराळ कार्यक्रम यांसारख्या आव्हानात्मक उपक्रमांकडे अधिक लक्ष देईल.
ज्यांना असा उद्योग करण्याची इच्छा आहे त्यानी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा. इन स्पेस या नोडल एजन्सी कडे संपर्क साधावा.
इस्रोचे ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस असतात आणि ते ही मोफत. आताच Basics of Geocomputation and Geoweb Services या विषयात कोर्सेस चालू आहेत. अभ्यासू उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा.
एविता.
विषय खूप चांगला आहे पण शीर्षक
विषय खूप चांगला आहे पण शीर्षक चुकीचे दिलेय. कशाचे उद्योजक व्हायचे हे शीर्षकात नमूद केल्यास जास्त लोक हा धागा वाचतील.
तुमच्या कंपनीला व तुम्हाला उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!
म्हणजे इकडे इलान मस्क तयार
म्हणजे इकडे इलान मस्क तयार होणार. प्रमाणिकरण हा फार खर्चिक मुद्दा आहे.
मस्त माहिती. तुम्हाला खूप
मस्त माहिती. तुम्हाला खूप शुभेच्छा.
साधना म्हणते तसं शीर्षक बदललं तर योग्य आणि नेमका मेसेज मिळेल. उदा. इस्रोबरोबर व्यवसायाच्या संधी
चांगली माहिती.
चांगली माहिती.
एविता तुम्हाला तुमच्या या नवीन कामासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा!!
दोक्तरना पार्ट टाइम काम मिळेल
छान
अभिनंदन
ब्लॅककॅट,
ब्लॅककॅट,
इथे कुणाला मदत होईल म्हणून प्रामाणिकपणे लेखिकेने लिहिले आहे. त्याचे कौतुक सोडा, पण उलट काहीतरी फालतू टिप्पणी करणे, हे आवडले नाही. असो, मर्जी तुमची.
मीपण छान लिहिले
मीपण छान लिहिले
तुमचा जुना प्रतिसाद काढलात,
तुमचा जुना प्रतिसाद काढलात, याबद्दल आभारी आहे.
छान माहिती. तुम्हाला खूप
छान माहिती. तुम्हाला खूप शुभेच्छा.
चांगली माहिती दिलीत. इस्रो
चांगली माहिती दिलीत. इस्रो कडून किंवा इतर बँकांकडून अर्थसहाय्य उपलब्ध आहे का याची काही माहिती आहे?
तुमच्या स्टार्टअपसाठी खूप खूप
तुमच्या स्टार्टअपसाठी खूप खूप शुभेच्छा! छान माहिती देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रगतीबद्दलही वेळ मिळेल तसे इथे लिहीलेत तर इतरांना त्याचाही उपयोग होईल.
लेख वाचला. मला बरोबर समजलं
लेख वाचला. मला बरोबर समजलं असेल तर इस्त्रोच्या अंतराळातील उपग्रहांकडून मिळणार्या डेटावर प्रोसेसिंग करण्यासाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीची गरज आहे. थोडक्यात ह्या डेटावर एपिआय लिहुन ते इस्त्रोला हवे आहेत. बरोबर का?
लेख खूपच शब्दबंबाळ आणि माझं वरचं कनक्लूजन बरोबर असेल तर क्रिप्टिक ही झाला आहे. नक्की काय करणार हे सहज समजत नाहिये.
इस्रोचे ऑनलाईन सर्टिफिकेट
इस्रोचे ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस असतात आणि ते ही मोफत. आताच Basics of Geocomputation and Geoweb Services या विषयात कोर्सेस चालू आहेत. अभ्यासू उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा.
>> चांगली माहिती. अशी माहिती देत रहा. ईस्रो च्या अनिवासी भारतीयांसाठी काही कोळॅबोरेशन्स्च्या योजना आहेत का?
नक्की काय करणार हे सहज समजत
नक्की काय करणार हे सहज समजत नाहिये > +१
इस्रोला हवा असलेला चोख माल
इस्रोला हवा असलेला चोख माल देण्यासाठी चोख यंत्रे, उत्तम कर्मचारी भरायचे. निर्मिती करायची. ऐन वेळी टेंडर काढून परदेशी कंपनीस कंत्राट दिले तर हे आपल्या मार्केटमध्ये कसं खपवायचं?
खूप उपयुक्त माहिती. नवीन संधी
खूप उपयुक्त माहिती. नवीन संधी शोधणाऱ्याला उत्तम मार्गदर्शन.
https://www.isro.gov.in
https://www.isro.gov.in/unlocking-india%E2%80%99s-potential-space-sector
वेबिनारची लिंक :
https://youtu.be/xBInc3957M8
Dear Sadhna, Thank you so
Dear Sadhna, Thank you so much for your appreciation and for giving the link for the subject. Great!
Dear Srd. Thanks a lot. I don't think ISRO would play such tricks. Never. Since PM wants Atmanirbhar Bharat ISRO would always encourage more and more indigenous entrepreneurs to come forward and take part in nation building efforts. Best luck.
Dear Mami, Thanks for your appreciation.
Dear Kavin, Thank you so much for your appreciation and wishes.
Dear Upashi Boka, Thank you so much.
Dear Varnita, Thank you so much for your wishes.
Dear Dhani. Thanks a lot. Yes Banks are ready to finance the project. I myself have approached SBI.
Dear Svati2. Thank you so much for your appreciation. Ofcourse I will let all know as the projects move forward.
Dear Amitav, Thank you so much. Please refer the link provided by Dear Sadhana.
Dear Nilima, I am not sure whether NRIs can have opportunities but you can refer the link provided by Dear Sadhana. Thank you anyways.
Dear Kishor Mundhe, Thank you so much for your appreciation.
Thanks to all budding entrepreneurs. See you soon.