असत्यवाद
Submitted by मप्र on 11 January, 2021 - 09:15
Reflecting on the recent break-in at the US Capitol by Trump supporters consumed by the false narrative of the last election wrote my first ever gazal with context/meaning in english. _/\_
[1]
मायावी भ्रमांचे गुंतती जाळे
शुभ्रते सत्यही रंगती काळे
[2]
अज्ञानी झिंगुनी घरी स्वतःच्या
म्हणवुनि वीर खंडती ताळे
[3]
काजळी दिव्याते झाकली अशी
उजेडी अंधार वंदती कुळे
[4]
असत्ये झाकले पूर्णते असे
मध्यांन्नी पौर्णिमा सांगती खुळे
[5]
अंधार पाजळे दिव्याशी इथे
सूर्यास काजवे संतती मिळे
विषय:
शब्दखुणा: