"ठो उपमा" - प्रसंग-१
गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग :
गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग :
गणपती बाप्पा मोरया!
सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो सगळेच काढतात. पण चंद्राचे फोटो त्यामानाने कमीच!
गणपती व चंद्राचा पुराणातला संबंध सर्वांना ठाऊक आहेच. गणेशाने ज्या चंद्राला आपला डावा दात फेकून मारला, त्यालाच नंतर उ:शापही दिला. तेव्हापासूनच चतुर्थी आणि चंद्रोदयाचं समीकरण तयार झालं असं म्हणतात.
साहित्यातल्या ठोकळेबाज उपमांमध्ये प्रेयसीला/नायिकेला चंद्राची उपमा दिलेली आढळते. चंद्र आहेच तसा सुंदर, मनमोहक. अशा चंद्राचं अनुपम सौंदर्य तुम्ही कॅमेर्याने टिपलंय कधी? दाखवा बरं मग ते सौंदर्य सगळ्या मायबोलीकरांना!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
गणपती बाप्पा मोरया!
कोण्या शहराची 'ती' शान तर कोण्या शहराची ओळख. कोणासाठी 'तिचा' प्रवास म्हणजे सहज हौस तर कोणासाठी गरज. अशी ही बालगीतातली झुकझुक गाडी पुढे मेट्रो, लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. तीच तुम्हाला बोलावते आहे मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्ये, झब्बू खेळण्यासाठी! 'गाडी बुला रही है!'
आगीनगाडीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हाला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ रेल्वेची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत. खर्या, खोट्या, चालू, बंद अशा कोणत्याही रेल्वेचे प्रकाशचित्र चालेल.
गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
गणपती बाप्पा मोरया!
१४ विद्या ६४ कलांचा अधिनायक असा गणपती बाप्पा आणि हा त्याचाच उत्सव! त्याला वंदन करून झब्बूच्या ह्या खेळाची सुरुवात करूया. ६४ कलांपैकी एखाद्या कलेचे सादरीकरण दर्शवणारी प्रकाशचित्रे देणे इथे अपेक्षित आहे. उदा. नृत्य करणारी नृत्यांगना, गाणारी गायिका, मूर्तीकाम करणारा कुंभार. अर्थात ६४ कलांपैकी सर्वच कला प्रकाशचित्रांद्वारे दाखवणे शक्य नाही ह्याची जाणीव आहेच, त्यामुळे जे शक्य आहे त्याची प्रकाशचित्रे द्यावीत.
संदर्भासाठी ६४ कलांची यादी शेवटी देतो आहोत.
चला, तर मग सुरुवात करूया खेळायला -
त्याआधी हे वाचून घ्या :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
गणपती बाप्पा मोरया!
आजच्या गतिमानतेत स्वतःसाठी पुरता वेळ मिळत नसताना "दुसर्याला मदत कोण करतो?" असे काहीसे निराशेचे सूर क्वचित मनात उमटत असतात. अशा वेळी 'एखाद्या माणसाने दुसर्या एखाद्या माणसासाठी' केलेल्या मदतीबद्दल काही वाचायला मिळालं तर ती निराशा निघून जाते, माणुसकीवरचा, देवावरचा विश्वास पुनरुज्जीवित होतो.
---------------------------------------------------------