मायबोली गणेशोत्सव २०१४
आता कशाला शिजायची बात - मंजूडी - आंब्याची डाळ (लिंबू पिळून)
अगो - मलाही कोतबो : टफी
भूह्हू,भूह्हू ! हम आपके है कौन ? असे विचारणार असाल तर तो प्रश्न मनातच ठेवा. अहो, हम आपके है, टफी.. आहात कुठं ! आता तुम्ही विचाराल की एवढ्या प्रेमळ, कुटुंबवत्सल, सद्वर्तनी आणि सुखी कुटुंबातला असून तुला कोतबोची काय रे गरज ? नाही तशी गरज पडलीच नसती पण एक सल फाsर मनात राहिला होता त्याबद्दल बोलायला आलो होतो पण ... ...
"ठो उपमा" - प्रसंग-७
गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग :
हे सगळं जेंव्हा असह्य झालं तेंव्हा अंजूने त्या टळटळीत दुपारी घरातला एसी सुरू करुन झोपी जाण्याचा निर्णय घेतला. छ्ळणार्या विचारांपासून सुटका करुन घेण्याचा तो एकच मार्ग होता. डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हते. दुसर्या कुणाबरोबर तरी लग्न करायचा विचारही तिच्या मनाला शिवत नव्हता. उलट सगळा भूतकाळ उसवत वर्तमानासोबत उभा ठाकला होता.
आसनं समर्पयामि - नीधप
"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
जिगीषा : मलाही कोतबो: अदिती
जिगीषा : मलाही कोतबो: अदिती
बरं झालं लोक्स मायबोलीने मला संधी दिली माझ्या मराठी प्रेक्षकांशी बोलायची , एरवी या सिरीयलवाल्यांनी मला नको जीव करून सोडलं आहे.आधीच मी नवीन . चार लोकांमध्ये तोंड वर काढलं की आधी कथानकाच्या थीमवरून सतरा प्रश्न , मग माझ्या आणि जयच्या पर्सनल लाईफवरून.
गणोबा आमच्या गावात - विनार्च - अनन्या.
पाल्याचे नाव : अनन्या विनायक राणे
वय : १०वर्ष ५ महिने
"मी अनन्या - मलाही कोतबो : डोरेमॉन".
(नमस्कार,मी विनार्च. हे माझ्या लेकीच लेखन आहे, मी फक्त टाईप करुन दिलय )
ओळखलं का मला? मीच तो... मीच तो....
नोबोताला सहन करणारा, मीच तो....
सगळी गॅजेट्स देणारा, मीच तो..
नाही ओळखलत ? श्या...
अहो डोरेमॉन...असं काय करता.कोणत्याही मुलाला (लहान हां) विचारा पटकन ओळख सांगतील
.
काय सांगू ओ तुम्हाला? मलापण रडावस वाटतं अगदी नोबिता सारख, फुल्ल कारंजा काढून. कधी कधी अस्सा राग येतो ना की बस्स! पण काय करणार हो ? स्पेअर पॉकेट पण त्याच्याकडेच असते.
त्याच्यासाठी अंगाई गा..गॅजेट्स द्या..सकाळी वेळेवर उठवा..उठला नाही तर रागवा..त्याला पिकनिकला घेऊन चला..जग फिरवा. काय, मला नोकर बनवलाय..
"ठो उपमा" - प्रसंग-६
गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग ६:
दुपारच्या जेवणात सलाड, उसळी, उकडलेल्या भाज्या असा लो कॅलरी, विदाऊट शुगर अंजूच्या आवडीचा भरगच्च मेनू शशिकलाबाईंनी निगुतीने स्वतःच्या हातांनी बनवला होता. तरीही अंजूने जेवणाच्या टेबलावर येण्यास नकार देण्याने आणि तिच्याच खोलीत तिचे जेवण मागवण्याने मगाशी दोघांना आलेल्या संशयावर खात्रीची मोहोर उमटली.
"ठो उपमा" - प्रसंग-५
गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग ५ :
"तरी मी सांगत होते तुम्हाला, आपण तिचं लग्न तिच्या परस्पर ठरवून टाकायला नको. तुम्ही ऐकलं नाही माझं अजिबात" काकुळतीला येऊन शशिकलाबाई विनायकरावांना म्हणाल्या. १२ वाजता येते म्हणालेल्या अंजूचा ३ वाजले तरी पत्ता नव्हता. इतक्या वेळ वाटत बघत असलेल्या काळजीची जागा आता भितीने घेतली होती.
Pages
