
गणपती बाप्पा मोरया!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये "क्विक अँड फास्ट" खाद्यपदार्थांची चलती आहे. रांधायला लागणार्या वेळेची बचत व्हायला हवी, पदार्थ चविष्ट हवा आणि पोषणमूल्येही योग्य प्रमाणात हवी याकडे लक्ष दिले जाते. अशा पदार्थांत अनेक चटपटीत भारतीय पदार्थ किंवा सॅलेडसारख्या पाश्चात्य पदार्थांचेही पर्याय उपलब्ध असतात.

नमस्कार मंडळी ,
गुणांचा ईश असा गणपती आणि आपली बच्चेकंपनी यांच नातं अतूट आहे . हे लोभस असं नातं अजून वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 'रंगात रंगुनी सार्या' हा केवळ छोट्या दोस्तांसाठीच असलेला उपक्रम. चला तर मग !
१) हा बच्चेकंपनीसाठीचाच उपक्रम आहे. ही स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.

गणपती बाप्पा मोरया!
कुठेतरी व्यक्त होणे ही खरेतर सगळ्यांचीच गरज! मायबोलीने मायबोलीकरांना 'कोणाशी तरी बोलायचंय' हे सदर देऊन काही प्रमाणात त्या गरजेची पूर्तता करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न केला आणि आपण इथे व्यक्त होऊ लागलो.

छोट्या दोस्तांनो, आता लवकरच तुमच्या घरी, घराजवळच्या मंडळात आपल्या सगळ्यांचा लाडका दोस्त येणार आहे आणि एकटाच नाही काही, त्याच्यासोबत 'स्टुअर्ट लिटील' सारखा एक पिटुकला उंदीरही असणार आहे. ओळखा पाहू कोण? अहो तोच जो फार फार गुणी आहे, १४ विद्या आणि ६४ कला ज्याला येतात आणि ज्याला तुमच्या इतकीच मज्जा, धम्माल आणि मस्ती करायला आवडते. ओळखलंत ना? आमचा तुमचा लाडका गणपती बाप्पा!!