मायबोली गणेशोत्सव २०१४ : गणोबा आमच्या गावात (उपक्रम)

Submitted by संयोजक on 15 August, 2014 - 01:16

छोट्या दोस्तांनो, आता लवकरच तुमच्या घरी, घराजवळच्या मंडळात आपल्या सगळ्यांचा लाडका दोस्त येणार आहे आणि एकटाच नाही काही, त्याच्यासोबत 'स्टुअर्ट लिटील' सारखा एक पिटुकला उंदीरही असणार आहे. ओळखा पाहू कोण? अहो तोच जो फार फार गुणी आहे, १४ विद्या आणि ६४ कला ज्याला येतात आणि ज्याला तुमच्या इतकीच मज्जा, धम्माल आणि मस्ती करायला आवडते. ओळखलंत ना? आमचा तुमचा लाडका गणपती बाप्पा!!
या आपल्या लाडक्या मित्राला १० दिवस एकाच जागी बसून बसून कंटाळा येत असेल नाही? मग काय करायचं आपण? एक आयडिया ! आई मोदक करेपर्यंत तुम्ही गणोबाला आणि त्याच्या उंदीरमामाला तुमच्या परिसरातल्या छान छान गोष्टी दाखवायला घेऊन जा. मस्त खाऊ खा, शॉपिंग करा, नुसती धम्माल !
ठरवा बरं मग तुमचा 'सिक्रेट प्लॅन' पटकन आणि तो सांगा फक्त बाप्पाला. कसा सांगायचा? सोपं आहे.
तुमच्या वहीवर, पाटीवर, कुठेही तो सगळा प्लॅन लिहून काढा आणि पाठवून द्या मायबोलीवर!
पण त्या आधी आई- बाबांना ही नियमावली वाचून घ्यायला सांगा.

१) ही स्पर्धा नाही, उपक्रम आहे. वयोगट - ७ ते १५
२) उपक्रमात आपल्या पालकांच्या आयडी नेच भाग घ्यायचा आहे.
३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४) लेखन मुलांच्याच हस्ताक्षरात असावे. पालकांनी ते स्कॅन करून किंवा फोटो काढून स्वतःच्या आयडीने अपलोड करायचे आहे.
५) लेख मराठी भाषेतच लिहिलेला हवा. पालकांनी मुलांकडून लेख गिरवून घेतला तरी चालेल.
भाषेचे बंधन असले तरी लिपीचे बंधन नाही. लेखन देवनागरी किंवा रोमन यापैकी कोणत्याही लिपीत केले तरी चालेल.
६) पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे पण मुख्य विचार व शब्द मुलांचेच असावेत.
७) प्रवेशिका २९ ऑगस्ट २०१४ (भारतीय प्रमाण वेळ) पासुन ७ सप्टेंबर (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याची प्रमाण वेळ) पर्यंतच प्रकाशित केल्या जाव्यात.

प्रवेशिका अपलोड करण्याआधी हेही वाचा -
१) लेखन पाठवण्याकरता पालकांनी 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रूपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.
हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २९ ऑगस्टपासून (भारतीय प्रमाण वेळ) खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२) 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (कृपया 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ग्रूप मधील 'गप्पांचे पान', 'नवीन कार्यक्रम' हे पर्याय वापरू नका. )
४) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
गणोबा आमच्या गावात - मायबोली आयडी - पाल्याचे नाव.
५) विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यु) मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.
६) शब्दखुणा या चौकटीमध्ये "मायबोली गणेशोत्सव २०१४" आणि "गणोबा आमच्या गावात" हे शब्द लिहा.
७) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकुरात लेखाचे प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व' मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' लेखनाची इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb पेक्षा जास्त नसावे.
८) मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा. - http://www.maayboli.com/node/1556
९) प्रकाशचित्राखाली पाल्याचे नाव, वय ही माहिती लिहा.
१०) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
११) Save ही कळ दाबा.
१२) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

विषय: 

संयोजक, हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे ना?
असं विचारण्याचं कारण म्हणजे चित्रातली मुलगी 'डोरा' आहे.

@मंजूडी
संयोजक, हे चित्र प्रताधिकारमुक्त आहे ना?
असं विचारण्याचं कारण म्हणजे चित्रातली मुलगी 'डोरा' आहे.
<<< तुमची शंका रास्त आहे. परंतु डोराचे चित्र आधी हाताने काढून मग ते स्कॅन केलेले आहे. तरीही प्रताधिकारासंबंधी आम्ही अ‍ॅडमिनांशी बोलत आहोत. इथे अपडेट करू. धन्यवाद.

@सायो
आमच्याकडे मराठी लिहिता, वाचता येत नाही त्यामुळे सहभाग असत नाही कधीच.
<<< नियम क्र. ५ खास तुमच्या अशा बालमित्रांकरताच आहे. Happy

५) लेख मराठी भाषेतच लिहिलेला हवा. पालकांनी मुलांकडून लेख गिरवून घेतला तरी चालेल.
भाषेचे बंधन असले तरी लिपीचे बंधन नाही. लेखन देवनागरी किंवा रोमन यापैकी कोणत्याही लिपीत केले तरी चालेल.