"मी अनन्या - मलाही कोतबो : डोरेमॉन".

Submitted by मी अनन्या on 3 September, 2014 - 01:19

(नमस्कार,मी विनार्च. हे माझ्या लेकीच लेखन आहे, मी फक्त टाईप करुन दिलय )

ओळखलं का मला? मीच तो... मीच तो....
नोबोताला सहन करणारा, मीच तो....
सगळी गॅजेट्स देणारा, मीच तो..
नाही ओळखलत ? श्या...
अहो डोरेमॉन...असं काय करता.कोणत्याही मुलाला (लहान हां) विचारा पटकन ओळख सांगतील
.
काय सांगू ओ तुम्हाला? मलापण रडावस वाटतं अगदी नोबिता सारख, फुल्ल कारंजा काढून. कधी कधी अस्सा राग येतो ना की बस्स! पण काय करणार हो ? स्पेअर पॉकेट पण त्याच्याकडेच असते.
त्याच्यासाठी अंगाई गा..गॅजेट्स द्या..सकाळी वेळेवर उठवा..उठला नाही तर रागवा..त्याला पिकनिकला घेऊन चला..जग फिरवा. काय, मला नोकर बनवलाय..

नोबिताची आई पण तसलीच. दिवसभर पोरगा बाहेर फिरतोय काय फिकीर नाही. जियानने बदडला,जंगलात हरवला,बेटावर गेला..काय होतय, संध्याकाळी जेवायला घरात आला की बस्स खूप झाल. हां, नाही आला तरी मलाच पाठवा.काय माझं नशिब फुटक ? मीच सगळ्यांना सांगत असतो"ओ, माझं ऐका ना प्लीज" पण माझं तर ऐकत कोण? गडबड झाल्यावर मग सगळे ओरडतात...डोरेSssssमॉन
ओ, मी काय केलं तुमच?

आता सध्या जो नवीन पिक्चर आलाय ना म्हणे "जादू मंतर और जहंन्नुम" त्यात सुद्धा माझी गॅजेट्स बेभानपणे वापरतो.नोबिता ना ,रोज माझ्याकडे बँबू कॉप्टर मागतो. अरे! बँबू कॉप्टर नाही. बांबूच घालीन डोक्यात Proud पण काय ? त्या माझ्या निर्मात्या म्हणजेच "फुजिको फुजिओ" ने अशी काय "फुजिती" केली आहे ना माझी..

चला, थॅन्क यु ऐकून घेतल्याबद्द्ल....माझ तर काय होतच राहील Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली!
तक्रार रास्त आहे रे डोरेमॉन. त्या नोबिताच्या आईला इथली त्रासदायक मुलांशी कसे वागावे ची लिंक दे. तसंच तू त्याला स्वत: मार्ग काढायला शिकव समस्येतून. तरच नोबिता शाणा होईल आणि तू सुटशील.
बादवे, स्पर्धा कोण जिंकेल हे सांगणारं गॆजेट आहे का एखादं? Proud

मलापण रडावस वाटतं अगदी नोबिता सारख, फुल्ल कारंजा काढून. >>> खर्रच. एकदम योग्य वर्णन.

अनन्या, हे कोतबो मला फार फार आवडलं. Happy

रच्याकने, माबोकरांची नविन पिढी इथे येऊ लागलीये. त्यातल्या झरबेरा, अनन्या बिनीच्या सरदारणी. मस्तच.

कोतबो मध्ये लिहायला मी माझ्यासाठी धागा उघडला आणि हिला "गणोबा आपल्या गावात" ओपन करुन दिला तर मॅडमना कोतबच्या आयडिया येऊ लागल्या सो गणोबा थोडे मागे राहिलेत... Wink

अनन्या भारीच की...
आत्ता मला कळलं सगळ्या लहान मुलांना डोरेमॉन का हवा असतो ते....
लिखाण आवडलं अनन्या...:)

खुप मस्त.
अहो डोरेमॉन...असं काय करता.कोणत्याही मुलाला (लहान हां) विचारा पटकन ओळख सांगतील >> मी पण सांगेल हं, माझाही आवडता आहे डोरेमॉन.

@ विनार्च - आपली लेक सर्वगुणसंपन्न आहे.+ १११११

मस्त! Happy कोतबो काय हे लहान मुलांना पण कळलं! त्या मानाने काही मोठ्या लोकांनी नुसतीच मालिकेची उजळणी केली आहे!