गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही. रविवारी दिवसा बराच काळ झोप भरून काढण्यात गेला. माझा मुलगा त्या दिवशी सरप्राईझिंगली छान राहीला. एकदाही आईच पाहिजे म्हणून रडला नाही. बाबाबरोबर एकदम व्यवस्थित राहीला. नाहीतर पूर्वी आई दिसली नाही ५ मिनिटं की शोधमोहिम चालू. तसे झाले नाही. मला रविवारी जरा बरे वाटू लागल्यावर ह्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले! मनात म्हटले अरेवा! २०१६ ची सुरूवात छानच झाली! लिटल डिड आय नो, ती वादळापूर्वीची शांतता होती.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. डॉ. टेंपल ग्रांडीन नाव घेतलं की कानाला हात जातो इतके आदरणीय व्यक्तीमत्व. स्वतः १९४९ मध्ये वय वर्षे २ असताना ऑटीझम(ब्रेन डॅमेज) डायग्नोसिस मिळालेल्या टेंपल ग्रांडीन - त्यांना मिळालेल्या चांगल्या शिक्षिकांमुळे त्याच्बरोबर अतिशय जिद्दीच्या, धडाडीच्या आईमुळे पुढे बोलू लागल्या, शिक्षण घेतले,अॅनिमल सायन्समध्ये पीएचडी देखील केली. ऑटीस्टीक लोकांसाठी हग मशिन त्यांनी डिझाईन केले. व मुख्य म्हणजे ऑटीझमच्या त्या अगदी महत्वाच्या प्रवक्त्या आहेत. ऑटीझमवरील त्यांची भाषणं, कॉन्फरन्सेस प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तकं देखील!
ही अशीच गंमत. ही माझी फक्त मुलासंबंधित टूडू लिस्ट. तरी शाळेसंबंधित काहीच आले नाही यात.
नो वंडर, मला मुलाखेरीज दुसरे काहीच सुचत नाही..
मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर कितीही प्रयत्न केला तरी मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोसेसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम.
ही माझ्या मुलाची चित्रकला व लेखनकला. तो साधारण एक सव्वा वर्षाचा असल्यापासून त्याला एबीसीडी, शेप्स, कलर्स ओळखू येऊ लागले. मग हळूहळू २र्या वर्षापासून स्पीच, एबीए थेरपीस्ट यांच्याबरोबर खेळताना चित्रकला हा एक मुख्य पूल झाला संवादाचा. तेव्हापासून मुलाला चित्रकला , लिहायला खूप आवडते. त्याला जेव्हापासून लिहून दाखवले तर आईला कळते लवकर हे समजले, तेव्हापासून तर अजुन मजा येऊ लागली. अर्थात तो खूप लिहीत नाही. तो आठवड्या-२ आठवड्यातून एखादा शब्द लिहीत असेल. मला त्याला कितीही इच्छा झाली तरी लिहीण्यासाठी फोर्स करायचे नाही. तो मनाने, स्वतःहून लिहील तेव्हाच त्याला त्यात मजा वाटेल.
मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
मागील लेखावर्/चर्चेवर मिळालेल्या प्रतिसादांच्या प्रोत्साहनाने तसेच माझ्या नवीन वर्षाच्या संकल्पानुसार मी माझा आउटलुक बदलण्यावर गेला महिनाभर काम करत आहे. मैत्रिणींशी/काही जवळच्या नातेवाईकांशी खुल्या मनाने चर्चा केली. आता मला पुन्हा नव्याने पॉझिटीव्ह दृष्टीकोनाने कामाला लागायची प्रेरणा मिळाली. तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनासाठी परत एकदा आभार!
या लेखमालिकेतील ७व्या लेखात तुम्ही Applied Behavior Analysis बद्दल थोडे वाचले. आता जरासे खोलात जाऊन पाहू, एबीए मध्ये नक्की काय काय होते.