मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.
होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय-
२१ एकाच विषयाचे चित्रपट - (भाषेचे बंधन नाही) -
मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.
होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय:
२. २१ एकाच गायकाची गाणी - चित्रपट वेगवेगळा हवा, चित्रपटाबाहेरची गाणी नकोत.
३१ जुलै १९८०. रफीसाहेबांसाठी तो एक नेहमीचा दिवस होता. सकाळी सहाच्या दरम्यान उठून नेहमीप्रमाणे बाल्कनीत बसून एका हातात बिनसाखरेच्या चहाचा कप तर दुसऱ्या हातात रेकॉर्डिंगसाठी तयार असलेल्या गाण्याचा कागद. चहाचे घोट घेत घेत, मेहुणे झहीर यांनी उर्दूमध्ये सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या त्या ओळी त्यांनी काळजीपूर्वक डोळ्याखालून घातल्या. सूर्योदयाबरोबर उठणे हि लहानपणापासूनची सवय. तो दिवस सुद्धा अपवाद नव्हता.
तेलंगणा आणि आंध्रात बिगबजेट तेलुगू सिनेमे इतके कसे चालतात? म्हणजे तमिळनाडूत हिंदी भाषा शाळेत शिकवली जात नाही शिवाय तिथे हिंदीला मोठा विरोधही आहे त्यामुळे तमिळनाडूत हिंदी सिनेमे क्वचित बघितले जातात; पण तेलंगणा आणि आंध्रमधे हिंदी समजणारी जनता बहुसंख्य आहे.उर्दूभाषिक मुस्लिम लोकसंख्याही बरीच आहे. शिवाय तेलंगणा आणि आंध्रमधल्या शाळेतही हिंदी शिकवतात.मग असं असूनही बॉलिवूडच्या सिनेमांनी तेलुगू सिनेमांचं मार्केट कसं कमी केलं नाही?
आज सोशल मिडीयावर सकाळपासून हिच चर्चा सुरु आहे. नानावटी मध्ये दाखल असलेले बीग बी सोशल मिडीयावर नेहमीप्रमाणेच कार्यरत आहेत आणि एका अनामिक ट्रोलरच्या कमेंटमुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांनी चांगलीच आगपाखड केली आहे.
टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ यांनी ठोक दो साले को असे शब्द उच्चारत, माझे ९० कोटी फॉलोअर्स आहेत ते तुला गायब करतील, तुला तुझ्या बापाचे नावही माहीती नाही वगैर शब्द वापरले आहेत.
आमिर खान ‘कयामत से कयामत तक ‘ मधे विवाहीत असल्याचं कळाल्यावर तुमच्यापैकी किती जणांच्या ह्रदयाचा ठोका चुकला होता?( जसं कि विवाहीत नसता तर तुमच्या बरोबरच संसार थाटणार होता)
.
आणि किती जणांना तेव्हा हे माहिती होतं की पाप केहते है मधे ती लाल कपडे घातलेली त्याची बायको आहे ते..
.
लहानपणी अशा सगळ्या माहितीचा प्रसार मी टेडटाॅक मधे बोलल्या प्रमाणे करायचे...
.
देवा काय दिवस होते ते.. लहानपणी ह्या सगळ्या गोष्टींकडे जरा कमी लक्श देऊन जरा जास्त आभ्यास केला असता तर आज नक्कीच कुठे तरी टेडटाॅक देत असते..
.
सायली राज्याध्यक्षांच्या फेसबुक पोस्टमधे ‘स्वामी’ चित्रपटाचा उल्लेख होता. तोपर्यंत हा चित्रपट बासू चॅटर्जींचा आहे हे माहीत नव्हतं. फक्त ‘पलभर में ये क्या हो गया’ हे आवडीचं गाणे यातलं आहे हेच माहीत होतं. याच चित्रपटावरून संजय लीला भन्साळीने ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट काढला असाही उल्लेख होता. त्यामुळे कुतूहल चाळवलं गेलं. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट जरी ओटीटी असला तरी त्यातल्या बेसिक प्रिमायसेसमुळे आवडला होता.
५०-६०-७० चे दशक हिन्दी चित्रपटसन्गिताचा सुवर्णकाळ होता. प्रतिभावान सन्गितकार, गायक, कवी या सर्वांनी मिळुन प्रेम, विरह, भक्ती, समर्पण अशा विवीध प्रकारच्या गाण्यांचा नजराणा आपल्याला पेश केला. पण सर्वात प्रसिद्ध होती ती एकमेकांचे चारचौघात वाभाडे काढणारी गाणी.
विश्वास नाही ना बसत? बघा तर मग...
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...