रफीसाहेबांची ४०वी पुण्यतिथी

मोहम्मद रफी: अखेरचा दिवस...

Submitted by अतुल. on 31 July, 2020 - 07:59

३१ जुलै १९८०. रफीसाहेबांसाठी तो एक नेहमीचा दिवस होता. सकाळी सहाच्या दरम्यान उठून नेहमीप्रमाणे बाल्कनीत बसून एका हातात बिनसाखरेच्या चहाचा कप तर दुसऱ्या हातात रेकॉर्डिंगसाठी तयार असलेल्या गाण्याचा कागद. चहाचे घोट घेत घेत, मेहुणे झहीर यांनी उर्दूमध्ये सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या त्या ओळी त्यांनी काळजीपूर्वक डोळ्याखालून घातल्या. सूर्योदयाबरोबर उठणे हि लहानपणापासूनची सवय. तो दिवस सुद्धा अपवाद नव्हता.

Subscribe to RSS - रफीसाहेबांची ४०वी पुण्यतिथी