Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
.
.
छान कल्पना . इथे लिहीत जाईन .
छान कल्पना . इथे लिहीत जाईन .
सोहळा पाहिला . चांगला आहे . सचिन आणि शिल्पा ने छान काम केले आहे .
सोहळा कुठे पाहिला?
सोहळा कुठे पाहिला?
सोहळा कुठे >> प्राइम.
सोहळा कुठे >> प्राइम.
सोहळा कुठे >> प्राइम.
सोहळा कुठे >> प्राइम.
मराठी चित्रपटांसाठी एक धागा
मराठी चित्रपटांसाठी एक धागा होता आधी, नाव आठवत नाही.
"कोफी आणि बरेच काही" पहिला
"कोफी आणि बरेच काही" पहिला (उशिरा पहिला !) , वैभव तत्ववादी - काय मस्त काम केलाय त्याने ! आणि दिसलाय पण छान ! खूप पुढे येणार असे वाटते , मात्र चित्रपट बराच संथ वाटला , कथा पण खूपच छोटी आहे.
मराठी चित्रपटांना इंग्रजी श्रेयनामावली इंग्रजी मध्ये खटकते
फास्टर फेणे पाहिला airtel TV
फास्टर फेणे पाहिला airtel TV वर.. छान आहे... गिरीश कुळकर्णीची acting जबरदस्त आहे... अमेय वाघ ऐवजी अंकुश चौधरी असता तर अजून धमाल आली असती असं वाटतंय...
>>>>अमेय वाघ ऐवजी अंकुश चौधरी
>>>>अमेय वाघ ऐवजी अंकुश चौधरी असता तर अजून धमाल आली असती असं वाटतंय...>>>>>> अंकुश चौधरी चे वय बघता तो अजिबात शोभला नसता
अमेय वाघ ऐवजी अंकुश चौधरी
अमेय वाघ ऐवजी अंकुश चौधरी असता तर अजून धमाल आली असती असं वाटतंय... >>>> छे छे ! त्या रोलसाठी अंकुश चौधरी किती प्रौढ आहे. फास्टर फेणेचं चित्र पाहिलं आहे का? अमेय वाघचं कास्टिंग परफेक्ट आहे.
संदीप कुलकर्णी (श्वास मध्ये काम आवडलं) आणि पल्लवी सुभाष (गुंतात हृदय मध्ये खूप छान दिसली) यांची नावं बघून मराठी सिनेमा 'प्रेमसूत्र' पहिला. अत्यन्त भयाण टुकार सिनेमा. कास्टिंग डायरेक्टर कोणत्या मूडमध्ये होता कोण जाणे. मुख्य भूमिकेत संकु अजिबात शोभला नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाला असे गोव्यामध्ये ट्रिप आणि वन नाईट स्टँड वाले रोल अजिबात शोभत नाहीत. त्या भुमिकेत फार ओढून ताणून शिरावं लागलं आहे हे कळून येत होतं. कॅरेक्टर जरी 30-31 वयाचं दाखवायचं असलं तरी संकु चाळीशीचा वाटतो. कित्येक शॉट्समध्ये एवढ्या सुरकुत्या दिसतात. यात संकुच्या दिसण्यावर टीका करायची नाहीए तर कास्टिंग डायरेक्टरची निवड चुकली आहे हेच म्हणायचं आहे. एक वेळ कास्टिंग खपवून घेतलं असतं पण एवढी कथा फालतू आहे. अपवाद वगळता, मराठी सिनेमा आणि सिरीजमध्ये एखादा रोल प्रोफेशन दाखवताना त्याचा किंचितही अभ्यास का करत नाहीत?
मिरिंडा हाऊस पाहिला, ( का
मिरिंडा हाऊस पाहिला, ( का पाहिला? ). एकदम टुकार चित्रपट आहे.
वन्स मोर असला कधी शिनेमा येऊन
वन्स मोर असला कधी शिनेमा येऊन गेला म्हणे
मराठी बाहुबली की मगधीरा ?
फास्टर फेणेचं चित्र पाहिलं
फास्टर फेणेचं चित्र पाहिलं आहे का? अमेय वाघचं कास्टिंग परफेक्ट आहे>>>>
हो, चित्र पाहिलं आहे...दिसण्यानुसार अंकुश चौधरी शोभला नसता पण त्याचं काम मस्त असतं म्हणून जास्त धमाल आली असती असं वाटतंय मला..
अमेय वाघ ऐवजी अंकुश चौधरी
अमेय वाघ ऐवजी अंकुश चौधरी असता तर अजून धमाल आली असती असं वाटतंय... >>>>
स्वप्नील जोशी ने आणखी चांगला केला असता फास्टर फेणे . चेहऱ्यावरून तो एकदम सेम फेणे वाटतो .
स्वप्नील जोशी ने आणखी चांगला
स्वप्नील जोशी ने आणखी चांगला केला असता फास्टर फेणे . चेहऱ्यावरून तो एकदम सेम फेणे वाटतो >>>>>••• मग त्याचे नाव स्लोवर फेणे करावे लागले असते
आज लेथ जोशी पाहिला झी मराठीवर
आज लेथ जोशी पाहिला झी मराठीवर. आवडला. मी शाळेत टर्निंग सेक्शनला (टर्नर) होतो त्यामुळे 8 वी ते 10 वी मॅन्युअल लेथ मशीन ऑपरेट केली आहे. आज कित्येक वर्षांनी लेथ बघितली. मशीन, बर, ते वातावरण एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. छान बनवलाय. नायक आणि लेथचे नाते, सी एन सी मशीन आल्यावर ऑटोमेशनमुळे लेथ स्क्रॅप झाल्यावर झालेली नायकाची घालमेल, घरची परिस्थिती, बायको, आई , मुलगा इ सगळं मस्त दाखवलंय. सर्वांनी छान अभिनय केलाय.
मी आज गुलाबजाम चित्रपट पाहीला
मी आज गुलाबजाम चित्रपट पाहीला. मोठी सो.कु. होती तरी आवडला. मराठी पदार्थांंसाठी तरी हा चित्रपट एकदा बघाच. सिदार्थ चांदेकर चांगला अभिनय करतो.
ईथे वाचून सोहळा पाहिला.
ईथे वाचून सोहळा पाहिला. आवडलाच. गंमत म्हणजे पहिल्यांदाच सचिनचा अभिनय आवडला. विक्रम गोखले छोट्याश्या भूमिकेत भाव खाऊन गेलेत.
वाहते पान आहे का ?
वाहते पान आहे का ?
देऊळ , वळू हे चित्रपट कुठल्या
देऊळ , वळू हे चित्रपट कुठल्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील ? नेटफ्लिक्स / अमेझॉनवर दिसत नाहीत .
कुणीतरी सांगितलं म्हणुन
कुणीतरी सांगितलं म्हणुन चेकमेट पाहिला.
मला टुकार वाटला.
देऊळ zee5
देऊळ zee5
वळू पण तिथेच असेल..
रच्याकने, देऊळ मध्ये meme मटेरियल खूप आहे
बोनस.. पाहिला प्राईम वर..
बोनस.. पाहिला प्राईम वर.. चांगला आहे ..
धन्यवाद अजिंक्यराव पाटील .
धन्यवाद अजिंक्यराव पाटील . झी5 वर बघते
बोनस पहिला. गश्मिर छान काम
बोनस पहिला. गश्मिर छान काम करतो. पण कुठेतरी बोनस त्याच्या वडीलांच्या (आकाशी झेप घेरे पाखरा) चित्रपटाच्या जवळ जाणारा वाटला.
मिरिंडा हाउस सुरुवात केली बघायला आणि अर्धवटच सोडलाय. लपंडाव आवडला मला. पुजा सावंत आहे त्यात.
लपंडाव कुठे पाहिला?
लपंडाव कुठे पाहिला?
म्हणजे तीन फुल्या तीन बदाम
म्हणजे तीन फुल्या तीन बदाम वाला का?मला खूप आवडतो.
पूजा सावंत बहुतेक लपाछपीमध्ये
पूजा सावंत बहुतेक लपाछपीमध्ये आहे. लपंडाव खूप जुना आहे. तेव्हा कदाचित पूजाचा जन्मही झाला नसेल
देऊळ zee5>>> नाहीये, मलापण
देऊळ zee5>>> नाहीये, मलापण बघायचा होता, पण नाहीये zee5 वर
Pages