Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोघी मला पण आवडला .. लोकडाऊन
दोघी मला पण आवडला .. लोकडाऊन काळात २ दा दाखवला सोनी मराठीवर..
पहिल्या तासात काही विशेष आहे
पहिल्या तासात काही विशेष आहे का तर बघेन. मग तेवढाच भाग बघेन.
Character development आहे
Character development आहे सुरुवातीला. नक्की पहा. आवडेल तुम्हाला.
बोनस पाहिला... आवडला...
बोनस पाहिला... आवडला...
रविवारी लालबागची राणी लागला
रविवारी लालबागची राणी लागला होता टीव्ही वर नाही आवडला
मी इतक्यात प्राईमवर पाहिलेले
मी इतक्यात प्राईमवर पाहिलेले सिनेमे
१. फैमिली कट्टा- छान आहे.आवडला.
२.अनवट-चांगला आहे.
३.टिसीजीएन-चांगला वाटला.
४.बापजन्म-बरा आहे.
५.सोहळा-ठिक आहे.
चंद्रमुखी पाहिला prime वर...
चंद्रमुखी पाहिला prime वर....आवडला....
आयपीटीव्ही वर गोदावरी बघितला.
आयपीटीव्ही वर गोदावरी बघितला. जितेंद्र जोशीचं नेहेमीप्रमाणे अप्रतिम काम!
थोडा इंटेन्स हेवी वाटला. पण बघायचाच होता बरेच दिवस. नाशिक, गोदावरी नदी पण पात्रच वाटावी सिनेमातली इतक्या सुंदर रित्या दाखवलंय.
नदी पात्र वाटायचं म्हणजे काय
नदी पात्र वाटायचं म्हणजे काय वर दोन सेकंद विचार करत बसलेलो
हाहाहा. मलाही लवकर नाही समजलं
हाहाहा. मलाही लवकर नाही समजलं.
पात्र आणि वाटणे - दोन्हीला २
पात्र आणि वाटणे - दोन्हीला २-२ अर्थ आहेत. त्यामुळे एकूण ४ अर्थ निघतात. (भांडे मिक्सरमधे घालून वाटणे वगैरे)
पात्रचे 3 अर्थ आहेत.
पात्रचे 3 अर्थ आहेत.
अंजलीने खरंतर छान कमेंट लिहिली आहे, पण माझी ट्युब पेटायला उशीर झाला.
पात्रच वाटावी सिनेमातली >>
पात्रच वाटावी सिनेमातली >> सिनेमातली मुळे कळलं पटकन.
पात्रचे चार अर्थ आहेत, वाटणेचे तीन.
ओह, हां. बरोबर मानव.
ओह, हां. बरोबर मानव. त्यातला चौथा पात्र हे विशेषण आहे. बाकी तीन नामे आहेत त्यामुळे ती संदिग्धता वाढवण्यास पात्र आहेत.
अरेच्या! हा धागा माहिती
अरेच्या! हा धागा माहिती नव्हता.
आता इथे वेळोवेळी येत जाईन.
आयपीटीव्ही वर गोदावरी बघितला.
आयपीटीव्ही वर गोदावरी बघितला.>>>मला पण बघायचा आहे गोदावरी..कुठे बघता येईल?...पैठणी आणि वाळवी पण आहेत लिस्ट मध्ये...वाळवी थिएटर मध्ये जाऊन बघण्याची खूप इच्छा होती पण नाही जमलं...
होडी
होडी
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित मराठी.
प्राईम वर आहे.
परिणामकारक शोकांतिका.
होडी
होडी
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित मराठी.
प्राईम वर आहे.>>>नक्की बघेन...prime वर अजून काही चांगले मराठी चित्रपट असतील तर प्लीज सुचवा...मला मराठी movies पाहायला खूप आवडतं...
वाळवी मस्त हलका फुलका वाटला.
वाळवी मस्त हलका फुलका वाटला. परत बघायला हरकत नाही.
अर्रर पात्रावरून एवढे अर्थ
अर्रर पात्रावरून एवढे अर्थ निघतील वाटलं नाही
आयपीटीव्ही वर आहे वाळवी (टीव्हीला नाही लागलेली वाळवी :डोमा:) पण खराब क्वालिटीत सिनेमा आहे.
होडी - लेटर्स टू मॉली पण चांगला वाटतोय. अर्धा पाहिला.
वाळवी बघायला आई, लहान मुलं
वाळवी बघायला आई, लहान मुलं घेऊन जाऊ शकतो का?
हा धागा माहितीच नव्हता.
हा धागा माहितीच नव्हता.
गडद अंधार कुणी पाहिला असेल तर अपडेट कराल का प्लीज ?
मृणाली, नाही.
मृणाली, नाही.
मला "लेथ जोशी" बघायचा आहे.
मला "लेथ जोशी" बघायचा आहे. कुठे मिळू शकेल? (जुना चित्रपट आहे).
झीफाईववर आहे लेथ जोशी.
झीफाईववर आहे लेथ जोशी.
थँक्यु झंपी.
वाळवी बघायला आई, लहान मुलं
वाळवी बघायला आई, लहान मुलं घेऊन जाऊ शकतो का?
>>>>
आईला न्यायला काहीच हरकत नाही.
मुले कुठल्या वयाची आहेत आणि काय समज आहे यावर अवलंबून आहे.
त्यात काही अश्लील वा वोईलेस नाहीये.
मी बघायला जरी एकटाच गेलो असलो तरी आता ओटीटीवर आल्यावर सगळ्यांना दाखवणार घरी.
वाळवी बघायला आई, लहान मुलं
वाळवी बघायला आई, लहान मुलं घेऊन जाऊ शकतो का?
>>>>
आईला न्यायला काहीच हरकत नाही.
मुले कुठल्या वयाची आहेत आणि काय समज आहे यावर अवलंबून आहे.
त्यात काही अश्लील वा वोईलेस नाहीये.
मी बघायला जरी एकटाच गेलो असलो तरी आता ओटीटीवर आल्यावर सगळ्यांना दाखवणार घरी.
गडद अंधार लोकमत फिल्मीचा
गडद अंधार लोकमत फिल्मीचा रिपोर्ट
https://www.youtube.com/watch?v=lCH8PlvwwWE
प्राईमवर होडी बघितला. आवडला.
प्राईमवर होडी बघितला. आवडला.
बरेच लुपहोल्स आहेत, काही अनावश्यक शॉट्स आहेत, काही उत्तरं मिळत नाहीत असं बरच काही.
पण तरल, काव्यात्म आणि एक काही खरेपणा (चित्रपट निर्मितीतला) हे सगळं उजवं ठरलं. गजेंद्र अहिरेंचा चित्रपट शोभला.
गजेंद्र अहिरे भारी चित्रपट
गजेंद्र अहिरे भारी चित्रपट असतात... बॅकग्राउंड म्युजिक वगैरे फुल्ल इमोशनल...
Pages