Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मृणाली, आई आणि मुलं एरवी
मृणाली, आई आणि मुलं एरवी थ्रिलर्स बघत असतील तर बिनधास्त घेऊन जा.अगदी एक दोन डायलॉग सोडले तर बाकी काहीही अश्लील इत्यादी नाही.हिंसा आहे.पण घरी टीव्हीवर साऊथ चे पिक्चर बघत असतील तर त्यापुढे वरणभात वाटेल.
होडी लेटर्स टू मॉली संपवला.
होडी लेटर्स टू मॉली संपवला.
बायकोच्या हट्टाने वाताहत झाली कुटूंबाची. तेव्हाच्या काळात असं करणं सुसंगत नसेल कदाचित पण ओव्हरॉल इफेक्ट छान आहे सिनेमाचा.
समहाऊ अलोक राजवाडेला सिरीअसली घेऊच नाही शकले मी. मधेच कधीही तो माझ्याशी नीट बोलायचं, भन्नाट आहे, वेगळं आहे अशा भाडिपा मोड मधे जाईल असं वाटत होतं.
मुलीचं काम केलेली छान आहे अॅक्ट्रेस. इनोसंट एकदम! लोकल कलाकार पण आवडले.
फनरल
फनरल
मृत्यू आनंदाने कसा स्वीकारावा आणि नंतर नातेवाईकांनी तो कसा साजरा करावा हा विषय चांगला हाताळला आहे.
सुखांत नावाची संस्था सध्या हे काम करते आहे. त्यावर आधारित असावा.
प्राईमवर आहे
वेगळा विषय आवडला
Prime वर काही चित्रपट ठराविक
Prime वर काही चित्रपट ठराविक काळासाठी असतात का ? कारण मी आत्ता गंध आणि अनवट शोधतेय तर दिसत नाहिये आणि हेच चित्रपट आधी prime वर होते असं वाचलं..
हो, काही काळाने काढून टाकतात.
हो, काही काळाने काढून टाकतात. सगळेच चित्रपट असे मर्यादित काळासाठी असतात का ते माहिती नाही, पण काही नक्की असतात.
हो. त्यांचे स्वत:चे वगळले तर
हो. त्यांचे स्वत:चे वगळले तर सगळी कॉट्रॅक्ट मर्यादित काळासाठीच असतात त्यामुळे बदलत असतात.
पण प्राइम वर शोधले व सापडले
पण प्राइम वर शोधले व सापडले नाहीत तर ते तेथे उपलब्ध नाहीत असे समजू नये
आपल्या प्लॅटफॉर्म वर काय उपलब्ध आहे हे ते इतक्या सहजी कळू देत नाहीत. टॅबू गेम मधे जसे मूळ शब्द न वापरता त्याच्याशी संबंधित इतर शब्द वापरून त्या मूळ शब्दापर्यंत पोहोचतात तसे करावे. म्हणजे त्यातील एखाद्या कलाकाराचा दुसरा पिक्चर शोधावा मग जो पाहिजे तो सापडतो. 
प्राईम वर शोधायचे असेल तर
प्राईम वर शोधायचे असेल तर मराठी शोधताना मंगोल असा सर्च देऊन पहा.
पण प्राइम वर शोधले व सापडले
पण प्राइम वर शोधले व सापडले नाहीत तर ते तेथे उपलब्ध नाहीत असे समजू नये Happy आपल्या प्लॅटफॉर्म वर काय उपलब्ध आहे हे ते इतक्या सहजी कळू देत नाहीत.>>> हो...याचा अनुभव आलाय आधीसुद्धा...
टॅबू गेम मधे जसे मूळ शब्द न वापरता त्याच्याशी संबंधित इतर शब्द वापरून त्या मूळ शब्दापर्यंत पोहोचतात तसे करावे. म्हणजे त्यातील एखाद्या कलाकाराचा दुसरा पिक्चर शोधावा मग जो पाहिजे तो सापडतो.>>>
मी हे माबोवर खूप वेळा वाचलंय
मी हे माबोवर खूप वेळा वाचलंय खरं, पण मला नाही असा अनुभव कधी आलेला. प्राईमवर आहे पण सर्चमधे येत नाही, असं कधी झाल्याचं आठवत नाही. आश्चर्य आहे.
"टॅबू गेम मधे जसे मूळ शब्द न
"टॅबू गेम मधे जसे मूळ शब्द न वापरता त्याच्याशी संबंधित इतर शब्द वापरून त्या मूळ शब्दापर्यंत पोहोचतात तसे करावे. " -
प्राईमचा content TV वर सर्च
प्राईमचा content TV वर सर्च करण्यापेक्षा मोबाईलवर खूप सोपे पडते.
होडी पाहिला ....चांगला आहे..
होडी पाहिला ....चांगला आहे...पण casting नाही आवडली...आलोक राजवाडे आणि मृण्मयी गोडबोले आई वडील म्हणून अजिबातच अपील झाले नाहीत...किती लहान दिसतात ते दोघे...Molly ची भूमिका केलेली मुलगी पंजाबी आहे का?गुर्बानी गिल नाव आहे तिचं....तिचा अभिनय खूप आवडला....अगदी सहज अभिनय केलाय तिने....चित्रपटाच्या शेवटी Molly तिच्या वडिलांना पत्र लिहिते तो आवाज मृण्मयीचा आहे हे clear लक्षात येतं... गुर्बानीला मराठी येत नसेल कदाचित...
प्राईम वर शोधायचे असेल तर
प्राईम वर शोधायचे असेल तर मराठी शोधताना मंगोल असा सर्च देऊन पहा>> थँक्यु. मला मराठी सर्च दिल्यास काही मराठी आणि त्या सोबत twilight चा पहिला भाग हाही ऑप्शन मिळत होता
फारएण्ड
फारएण्ड
काही वर्षांपूर्वी आलेला 'काकण
काही वर्षांपूर्वी आलेला 'काकण' चित्रपट बघितला. आवडला.
दोन समांतर पण कनेक्ट असलेले ट्रॅक आहेत. एक गोपी नावाच्या लहान मुलाची आजच्या काळातील कथा आहे आणि दुसरी जितेंद्र जोशी- उर्मिला कानिटकर कोठारे या star crossed lovers ची कोकणातील जुन्या काळातील प्रेमकथा आहे. बालनाट्य बोअर झालं पण तरी एकदा बघू शकतो. लव्हस्टोरी आवडली. जितेंद्र जोशी गोदावरीपासून खूपच आवडतो आणि यातही हळवा प्रियकर त्याने अगदी सहज व खूपच भारी साकार केला आहे. जितेंद्र आवडत असेल तर काकण नक्की बघा. उर्मिला पण मस्त. अल्लड अधीर प्रेमिका ते आयुष्याचं दान मनासारखं न पडल्यामुळे अलिप्त गंभीर राहणारी पन्नाशीची प्रौढा हे transition तिने छान दाखवलं आहे. शंकर महादेवनचं 'जगण्याची आशा' असं सुरू होणारं शीर्षकगीत खूप छान आहे आणि ते चित्रपटात सतत theme song म्हणून येत राहतं. कोकणातील समुद्राचे शॉट्स मस्त. ते बालनाट्य मात्र एडिट करून चित्रपटाची लांबी अर्ध्यावर आणता आली असती.
फार लॉजिक, सिनिसिझम न लावता बघितला तर चित्रपट शेवटपर्यंत बघावासा वाटतो.
सध्या जो कचरा हिंदी मराठीत बनत असतो त्यापेक्षा बेटर असलेला व उत्तम कलाकार, गाणी असलेला हा चित्रपट मला माहीतही नव्हता. युट्युबवर सजेशन्समध्ये आल्याने व युट्युबवर अधिकृतपणे फुकट उपलब्ध असल्याने बघितला. व्हॅलेंटाईन आठवडा चालू असल्याने trending मध्ये आहे बहुतेक.
आज 'गोष्ट एका पैठणीची '
आज 'गोष्ट एका पैठणीची ' पाहिला....छान आहे...चित्रपटाच्या शेवटी खूप छान संदेश दिला आहे....Honesty is the best policy....सायली संजीवने खूपच छान अॅक्टींग केली आहे...शेवटी पाणी आलं डोळ्यात....इतकी जिवंत वाटली कथा...इतरांचं काम पण छान आहे
@ WHITEHAT
@ WHITEHAT
काकण सुंदर आहे. काही उत्कट प्रसंग हृदयास स्पर्शून जातात.
उर्मिला कानेटकर च्या शेवटच्या प्रसंगातील अभिनय खुपच छान आहे.
<< सध्या जो कचरा हिंदी मराठीत बनत असतो त्यापेक्षा बेटर असलेला व उत्तम कलाकार, गाणी असलेला हा चित्रपट >> +१ अगदी
होडी बघितला. गोडबोले आणि
होडी बघितला. गोडबोले आणि राजवाडे दोघेही आवडले. अनिता असे का वागली ते कळले नाही. तिला जर त्याचे वागणे पटले नव्हते तर ती त्याच्या घरात का रहात होती. पोळ्या लाटून तीने घर चालवले तेही पटले नाही. शेवटी आत्मक्लेश करून घेऊन ती गेली, मुलगी लहान असताना तीने असे का केले कळले नाही. एकंदरीत शोकांतिका आहे. माउलीचे तीन परदेशीं मित्र बघून क्वीन आठवला. माऊलीसाठी तिच्या वडिलांनी लिहून ठेवलेली पत्रे बघून कुछ कुछ होता हे आठवला. आलोक पाठीवर आसूड ओढून घेत असतो ते बघून सवत माझी लाडकी आठवला. असो. शृंगारिक प्रसंग एवढा सविस्तर न दाखवता सूचक दाखवला असता तरी चालला असता. निळ्या डोळ्याचा टॅक्सी ड्राइवर मस्त.
काही वर्षांपूर्वी आलेला 'काकण
काही वर्षांपूर्वी आलेला 'काकण' चित्रपट बघितला. आवडला. >>>>
'काकण' सुंदर आहे. जितेंद्र जोशीचा वयस्क भूमिकेतील अभिनय आवडला. पण सुरुवातीचा हळवा प्रेमिक न वाटता थोडा भोळसट वाटतो. त्याची बोलीभाषा ही जाम गंडलेली आहे सुरुवातीला. उर्मिलाचा अल्लड प्रेमिका ते मॅच्युअर प्रौढा हा प्रवास सुरेख आहे. सुरुवातीची प्रेमकथा मध्येच अल्लड वयातील, मधेच विशीतल्या जोडप्याची वाटते. पण हे सर्व असूनही चित्रपट एकदा सुरु झाला की खिळवून ठेवतो. छोट्या मुलाची भूमिकाही अर्नेस्ट आहे. क्रांती रेडकरचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे.
आज 'गोष्ट एका पैठणीची '
आज 'गोष्ट एका पैठणीची ' पाहिला....छान आहे>>> मी पण काल पाहिला प्लॅनेट मराठी वर.
छान गुडी गुडी. सुव्रत आणि सायली दोघांचंही काम आवडलं. तो छोटू पण किती गोड.
सुहिता थत्ते जरा वेगळ्या गेटप मधे आवडली.
आलोक पाठीवर आसूड ओढून घेत असतो ते बघून सवत माझी लाडकी आठवला. >>>>>> कालच्या पैठणी मधे पण असाच सीन आहे.
शृंगारिक प्रसंग एवढा सविस्तर न दाखवता सूचक दाखवला असता तरी चालला असता. >>> ती डॉमिनेटींग आहे असं दाखवायचं असेल.
निळ्या डोळ्याचा टॅक्सी ड्राइवर मस्त >>>>+++११
काकण नाही आवडला मला.
काकण नाही आवडला मला. जितेन्द्र जोशी अर्धवट किंवा वेडसर च वाटत होता पूर्ण वेळ. त्यामुळे ती लव स्टोरी काही इन्टेन्स वाटलीच नाही. उर्मिला चांगली काम करते. मला त्यांचे कोकणी अॅक्सेन्ट्स फसलेले वाटले. एकूण काही जम्या नाही . अर्थात मला मुळात हे असले अति इमोशनल सिनेमे नाही आवडत फारसे. त्यामुळेही असेल.
काकण बघितला आहे.. इतका काही
काकण बघितला आहे.. इतका काही खास वाटला नव्हता.
काल गंध बघितला..छान आहे.
'गोष्ट एका पैठणीची ' पाहिला>>
'गोष्ट एका पैठणीची ' पाहिला>> हो छान गुडी गुडी आहे! मला क्षणभर आशा ही वाटत राहिली की हिला खरंच पैठणी मिळतेय का काय
पण मग ते वास्तविक झालं नसतं.
प्रीमियर च्या वेळी सायली आणि मृणाल दोघी भेटल्या. मृणाल अतिशयच तरूण दिसते अजून ही..ही नक्की काय लावते
सायली हून थोडीच मोठी वाटत होती.
'गोष्ट एका पैठणीची >>>
'गोष्ट एका पैठणीची >>> बांदेकर भावोजी आहेत काय त्यात ?
नाही नाही .. भाव्जी नाहीयेत.
नाही नाही .. भाव्जी नाहीयेत. साधी सरळ कथा आहे. ...
>>>>ही नक्की काय लावते Happy
>>>>ही नक्की काय लावते Happy
विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम
त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम
रुप को संवारे निखारे हरदम
हल्दी और चंदन का अनोखा संगम
Submitted by मंजूताई on 22
Submitted by मंजूताई on 22 February, 2023 - 14:45 >> अच्छा.
नावावरून माझी कल्पना झाली कि होम मिनिस्टरच्या धर्तीवर कथा असावी.
विको टर्मरिकच्या जाहिरातीत
विको टर्मरिकच्या जाहिरातीत आता सायली संजीव, तेजश्री प्रधान आणि स्पृहा जोशी असतात. चेहरे डिजिटली चमकवलेत असं वाटतं.
कुणी जग्गू आणि ज्युलिएट
कुणी जग्गू आणि ज्युलिएट पाहिला का?
Pages