मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो डॉगी हेमंत ढोमेचा स्वतः चा आहे .
<<<<< होना, घरचा असल्याने तो वयाने मोठा असूनही त्यालाच रोल मिळाला. (नेपो किड..) Proud नाहीतर 'puppy दे जयुला' हे बरोबर ठरले असते.

आणि तो बकरा?? इतका सुस्वरुप बकरा पहिल्यांदा बघितला…

मावशी, तमाशा कुठे लावलाय?? फुटलेच या प्रश्नाला.

सलतात रेशीमगाठी -आत्ज्या दिवशी तुम्हाला तुमचे केस घरीच बसल्या बसल्या उपटावासे वाटतील तेव्हा नक्की बघा.
म. मां ह्यांचे डोकं सध्या चालत नाही. फक्त त्याच त्याच एका विषयावर व लोकेशनवर (म्हणजेच कोकण) हे असतं.

दाभाडे बघायचा आहे, त्यामुळे वरच्या पोस्टी न वाचता स्क्रोल करावं लागलं आणि सगळा टीपी मिस करावा लागला याचं वाईट वाटतंय Proud

>>>>...बहिण जरा जास्तच ढवळाढवळ करते माहेरी पण अशा बहिणी असतात. त्याचा राग खरेतर स्वतःवरच असतो पण तो डिनायल मधेही आहे आणि जबाबदारी घेऊन आयुष्य सावरण्यापेक्षा दोष देणं सोपं वाटतंय त्याला. मी खूश नाहीतर मी माधुरीसकट इतरांनाही सुखाने राहू देणार नाही. मी तिरसटासारखं वागत राहिलो तर सगळ्यांना अद्दल घडेल वगैर पण सगळ्यात मोठी अद्दल तुम्हालाच घडत असते.<<<<<<<<<<<<

आहेत अश्या बहिणी व असेच लहान भाउ जे मोठ्या बहिणीच्या "मीच" बरोबर करते व ते तुमच्या भल्यासाठीच बाण्याचे बळी पडलेले.
आणि मुर्ख लहान भाउ स्वतःची चुकी( स्वतःचे मत वा बाजु मांडणे योग्य वेळी न कळम्याने) लपवायला जिंदगीभर आई-बाप नाहितर कोणा कोणाला दोष देणार..
त्यामुळेच चित्रपट अगदीच बेकार नाही वाटला.

तरीही, अमेय वाघाचा पात्रं बरोबर नाही दाखवलं. प्रेशर मुलींना नसतं कारण तसे तसं अजुनही कंडिंशनिंग असते, जे काही करणार सुरुवात ते नवराच. आपण फक्त अर्पण करायचं मगच सुशील मुली. किंवा ज्यास्त उत्साह दाखवलेला मुली म्हणजे आगाउ वगैरे वगैरे....

नेपोकिड पप्पी Lol बरोबर आहे तुमचं हेमंत ढोमे ने नेपो कीड ऐवजी नव्या लोकांना संधी द्यायला हवी होती जस नागराज मंजुळे देतात .
पण एक गोष्ट दोघांनी सारखी केलीय ढोमेनेही नागराज मंजुळे प्रमाणे स्वतःच्या गावात आणि गावातल्या लोकांना पिच्चर मध्ये शूट केलंय दाखवलंय.

मावशी, तमाशा कुठे लावलाय?? फुटलेच या प्रश्नाला.>>मी पण परत पाहिला यावेळी घरच्यां सोबत आम्ही भावंड पण आत्याच्या अंगात यायच्या सीनला तेव्हढेच हसलो जेव्हढे चित्रपटात तिघे हसतात.

Pages