तेलंगणा आणि आंध्रात बिगबजेट तेलुगू सिनेमे इतके कसे चालतात? म्हणजे तमिळनाडूत हिंदी भाषा शाळेत शिकवली जात नाही शिवाय तिथे हिंदीला मोठा विरोधही आहे त्यामुळे तमिळनाडूत हिंदी सिनेमे क्वचित बघितले जातात; पण तेलंगणा आणि आंध्रमधे हिंदी समजणारी जनता बहुसंख्य आहे.उर्दूभाषिक मुस्लिम लोकसंख्याही बरीच आहे. शिवाय तेलंगणा आणि आंध्रमधल्या शाळेतही हिंदी शिकवतात.मग असं असूनही बॉलिवूडच्या सिनेमांनी तेलुगू सिनेमांचं मार्केट कसं कमी केलं नाही? मराठी सिनेमांना बॉलीवूडच्या हिंदी सिनेमांची स्पर्धा असल्याने आणि मराठी लोकांना हिंदी समजत असल्याने महाराष्ट्रातच मराठी सिनेमे फारसे चालत नाहीत.क्वचित सैराट किंवा टाईमपास बनतो.कर्नाटकात अन्य भाषेतले सिनेमे कन्नडमधे डब करायला मनाई आहे.मल्याळम् भाषेत ॲक्शनपट फारसे बनत नाहीत.ती भूक मल्याळी लोक तमिळ मारधाडी सिनेमांद्वारे भरुन काढतात.
मग हेच तोटे तेलुगू सिनेउद्योगाला का भेडसावत नाहीत?तेलुगू सिनेमांचं बजेट जवळपास हिंदी सिनेमांइतकंच असतं.द्रविड अस्मिता वगैरे असेल तर तमन्ना, हंसिका मोटवानी, सिमरन, काजल अगरवाल आणि अशा कितीतरी उत्तर भारतीय, पंजाबी आणि सिंधी गोर्यापान नट्यांना तिकडच्या सिनेमांमधे कसं घेतात? त्यावेळी द्रविड अस्मिता कुठे जाते?
बरं इतकं करुन सेट मॅक्स आणि अन्य हिंदी वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्या हिंदीत डब केलेल्या तेलुगू सिनेमात फार नवीन असं काही नसतं.म्हणजे कथानकाला दर्जाही नाही. गावात राहणारा आजोबा, त्याला सोडून गेलेला मुलगा, नातवाने परत येऊन गावचा विकास करणे ही एक घिसीपिटी थीम किंवा दुसरी भाईला भिडणे. हा भाई लोकल गुंड ते आंतरराष्ट्रीय स्तराचा स्मगलर, गँगस्टर या वाईड स्पॅनमधे कोठेही असू शकतो. तेलुगू हिरो त्याला जराही घाबरत नाही.काँप्रमाईजचा तर विषयच नाही.जमिनीवर सहज पाय घासला की धुळीचे वादळ उठते.नावे तर कायच्या काय असतात एकेक या डब झालेल्या सिनेमांची. : )
मग असे मारधाडवाले सिनेमे तर बॉलीवूडमधे सुद्धा बनतातच की.टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल असे बॉलीवूडचे कितीतरी हिरो आहेत जे तेलुगू नटांपेक्षा दर्जेदार मारामारी करु शकतात.शरीरयष्टी तर कसली पिळदार आहे यांची.हे खरे ॲक्शन हिरो वाटतात. अर्धेअधिक तेलुगू हिरो तर पन्नाशीला पोहचलेत; तरी त्यांचे ॲक्शनपट का चालतात? हे बजेट वसूल होते तरी कसे? कसे परवडते या तेलुगू निर्मात्यांना हिंदीची स्पर्धा असूनही बिगबजेट तेलुगू सिनेमे बनवणे?
कोणाला याचे इंगित माहित असल्यास कृपया उलगडावे. _/\_
अईईर्र्र्ई भावड्या
अईईर्र्र्ई भावड्या
तू परत वादाचाच मुद्दा घेऊन आला का रं
ज्या कारणाने भारतात सलमान ,
ज्या कारणाने भारतात सलमान , अक्षय , देवगण चे चित्रपट चालतात त्याच कारणाने पन्नाशीच्या तेलगू हिरोंचे चित्रपट चालतात... स्टार पॉवर....
फक्त हैद्राबाद शहरात हिंदी
फक्त हैद्राबाद शहरात हिंदी बोलणारे खूप आहेत.
बाकी आंध्र - तेलंगणात फारच कमी.
शिवाय इथल्या लोकांची सिनेमाची चव जरा निराळी.
तेलगू आणि तमिळ सिनेमांना
तेलगू आणि तमिळ सिनेमांना स्टोरी , भावना , स्क्रिप्ट असं काहीच नसतं बहुधा ...
तीन तासात शे दोनशे माणसांना , २५-५० गाड्यांना आणि एखाद्या वेळेस हिरोईन ला उडवलं की झाला सिनेमा
तेलुगू सिनेमे चालतात कसे?>>
तेलुगू सिनेमे चालतात कसे?>> सीनेम्याना पाय नसतात त्यामुळे ते चालू शकत नाहीत. आपण चालत जाऊन ते बघतो. हीहीही pj
राहिला प्रश्न त्यांचे सिनेमे
राहिला प्रश्न त्यांचे सिनेमे चालायचा ( हिट व्हायचा )
आता तिथली लोकसंख्या (मातृभाषा बद्दल चा अभिमान पण यातच आला ) बघता आणि त्यांची श्रीमंती बघता हे सगळं होत असेल.
उगाच नाही रजनीकांत च मंदिर होत, अजित कुमार च्या पोस्टर्स वर dugdhabhishek होत...
खुप कमी सिनेमा हिंदीत डब
खुप कमी सिनेमा हिंदीत डब होतात, typical Telugu ani Tamil cinema tar Hindit dub Sudha karat Nahit.
Dub kelelya cinemanchi naaw originally meaningfullch astaat. Hindit tyachi waat lagte.
Mala Marathi typing Jamat nahiye mobilewarun.
प्रभास बाहुबली तिथलाच का?
प्रभास बाहुबली तिथलाच का?
तसे असेल तर ईथे बघा त्याचे मराठेतच किती चाहते आहेत?
https://www.maayboli.com/node/62532
@ऋन्मेऽऽष ते प्रभास च जाऊद्या
@ऋन्मेऽऽष ते प्रभास च जाऊद्या ओ
पण रोज नवीन पी एफ पी
तुम्ही राजेश शृंगारपुरे सारखे दिसताय ( आत्ताच्या फुटू मध्ये तर जास्तच)
आय स्विआर
प्रगल्भ धन्यवाद
प्रगल्भ धन्यवाद
दोन धाग्यांचे विषय दिलेत एकाच पोस्टमध्ये
इतकी वसूली निव्वळ स्टार
इतकी वसूली निव्वळ स्टार पॉवरमुळे?
० ० ?? आयला म्हणजे मराठीत तसे स्टारीझम नाही असे असल्यानेच बिगबजेट सिनेमे बनत नसावेत का?
कृपया माझं सिनेमाबद्दलच ज्ञान
कृपया माझं सिनेमाबद्दलच ज्ञान नगण्य आहे हे गृहीत धरून स्वतःच्या जबाबदारीवर वाचावे.
वैयक्तिक म्हणायचं झालं तर मला डोकं बाजूला ठेवून बघायचे सिनेमे फार आवडतात.
दिवसभर डोक्याला त्रास घेऊन काम केल्यानंतर निखळ मनोरंजन करणारे मारधाडपट उत्तम.
एक हिरो जेव्हा ५०-१०० गुंडाना एका फटक्यात उडवतो तेव्हा उगाच हे कसं शक्य आहे असा विचार करून डोकं पिकवणाऱ्या लोकांपैकी मी नाही.
आणि असं निखळ मनोरंजन बहुधा तेलगू सिनेमे करतात (मी फक्त हिंदीत डब केलेलेच पहिले आहेत) आणि सलमान खान चे काही चित्रपट, डॉन सारखा एखादा चित्रपट इत्यादी. मराठीतले काही विनोदी चित्रपट फार सुंदर आहेत. (मकरंद अनासपुरे यांचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा (पहीला), अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेचें काही सिनेमे इत्यादी)
दिवसभर वास्तवात जगत असल्याने मला वास्तवापासून दूर घेऊन जाणारे सिनेमे जास्त प्रिय आहेत.
आणि एकंदर माझ्या निरीक्षणानुसार हे सगळीकडेच खर आहे.
हॅरी पॉटर असेल, अव्हेंजर असेल, किंवा तत्सम अनेक सिनेमे ज्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही खूप लोकप्रिय झाले आहेत.
उलट बऱ्याचश्या मराठी सिनेमांची कथा वास्तवाच्या जवळ जाणारी असते. आणि नायक नायिका सुद्धा वास्तवाशी जोडलेले असतात.
आणि काही सायफाय सिनेमांमध्ये जसं कि 'फंटूश' किंवा अलीकडेच आलेला सोनाली कुलकर्णीचा कुठला तरी (टाइम ट्रॅव्हल शी संबंधित होता) मांडणी आणि बजेट गंडलेलं असतं. डायलॉग वास्तवाशी जोडलेले असतात.
थोडक्यात बरेच मराठी सिनेमे डोक्याला त्रास देतात, आणि डोक्याला त्रास करून घेण्यासाठी मी TV समोर किंवा सिनेमागृहात का जाईन? त्या साठी मी वास्तवात जगतोच आहे. म्हणून ते मराठी प्रेक्षकांना आकर्षित करून घ्यायला कमी पडतात.
त्यावेळी द्रविड अस्मिता कुठे
त्यावेळी द्रविड अस्मिता कुठे जाते?>> हे प्रकरण आंध्रा तेलंग णा मध्ये नाही. त्यांना त्यांची जाज्वल्य अस्मिता आहे कि. तुम्ही बघितलेत ते चांगले सिनेमे नाहीत. ओरिजिनल तेलुगु सि नेमे बघा. नुवू नेनू. शंकरा भरण स्वाति मुथ्यम सितारा क्षण क्षणम असे अजून भरपूर आहेत. तिथे स्क्रिप्ट जनतेची मानसिक गरज बघून बनवतात. हिरवीण मध्ये एक घरगुती तेलुगु मुलगी व एक फँ टसी स्त्री ( उत्तरे कडची गोरी उंच वगैरे.) लोकल विनोद छान असतात. मास चित्रपट पण बर्यापैकी वास्तव वादी असतात. बाहुबली हा एक वन ऑफ अ काइंड प्रॉजे क्ट होता.