विषय १: एक अतूट नातं - सिनेमाचं
"सिनेमाशी तुझं नातं काय"? असा प्रश्न जर कोणी भारतीय माणसाला विचारला तर मला वाटतंय कमी-अधिक फरकाने "आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:ख वाटून घेणारा एक सच्चा मित्र" असंच उत्तर मिळेल. मीही ह्याला अपवाद नाही. ओळख झाली तेव्हापासून अगदी मनापासून भरभरून प्रेम केलेलं आणि दोन्हीकडच्या अपेक्षांचा ताळमेळ साधण्यात कुठेच कसर न राहिलेलं हे एकमेव नातं. अर्थात सिनेमा म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती नसली तरी एक सच्च्या मित्राचं जे स्थान आपल्या आयुष्यात असतं तेच सिनेमाचंही आहे.