शाडूची माती

शाडूच्या मातीपासून केलेल्या गणेशमूर्ती

Submitted by चैतन्य दीक्षित on 10 August, 2012 - 17:33

दहिहंडी झाली की, किंबहुना त्याच्याही थोडं आधी श्रावण सुरू झाला रे झाला की 'चला, आता महिन्याभराने गणपती येणार' असे वेध बहुतेक सगळ्यांनाच लागतात. यावर्षीही सगळ्यांना असे वेध लागले आहेतच.
गेली १३ वर्षे, गणेशाच्या आशीर्वादामुळे दर वर्षी घरचा गणपती घरी करू शकलो. ह्यावर्षी अजून मूर्तिकाम सुरू केलं नाहिये, पण ते सुरू केलं की शक्य झाल्यास 'स्टेप बाय स्टेप फोटो' आणि मला माहिती आहे तितकी माहिती इथे देण्याचा मानस आहे. तोपर्यंत हे फोटो देतो आहे.

-गणपती बाप्पा मोरया!

१) गणपतीची मूर्ती घरी करावी ही प्रेरणा ज्यांच्यामुळे मला झाली त्या श्री. उमेश नारकर (सातारा) यांनी केलेली

विषय: 

शाडूची माती कुठे मिळेल???

Submitted by अमृता on 16 July, 2012 - 01:17

गेले तीनही वर्षी मी दुकानातुन नॅचरल क्ले आणुन गणपतीची मूर्ती घरी बनवली. यंदा शाडूच्या मातीची मूर्ती बनवायची आहे. मूर्ती बनवण्यासाठी तयार माती मला कुठे मिळेल? पेणला गेलं तर सहज मिळेल का?

दुकानातील मातीने मूर्ती बनवणं त्यामानाने सोप आहे. शाडूच्या मातीने पण जमलं पाहिजे म्हणुन जरा लौकर आणावी म्हणत्ये, नाहीच जमल तर दुकान आहेच जवळ. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शाडूची माती