कला
सॉफ्ट पेस्टल ड्रॉईंग- स्टील लाईफ
फुलांची वेणी
माझं लहानपण छोट्या गावात गेलं. घर भाड्याचं असलं तरी घरापुढे अंगण होत. अंगणात तगर, मोगरा, शेवंती, कुंदा, प्राजक्त ,अबोली अशी अनेक फुलझाडं होती. हार आणि वेण्या करणं हा माझा छंदच होता. असतील त्या फुलांचा रोज हार/वेणी मी रोज करत असे. पुढे शहरात आल्यावर गजरे/ हार हुकमी मिळत असले तरी स्वतः गजरा हार वेणी करण्याच्या सुखाला मात्र मुकले होते.
दृष्यावरून गाणे ओळखा- ४
Christmas miniatures
मायबोलीकर युट्युबर्स- drawing addict
मायबोलीवर बऱ्याच युट्युबर्स चे धागे पाहून मला पण माझ्या चॅनेल विषयी लिहावेसे वाटले.
इथे बहुतेक सर्वांना माहीतच असेल की मी आर्टिस्ट आहे. कला माझ्या हातात लहानपणापासुन होती. कोणतेही प्रशिक्षण न घेता मी इथवर आलो आहे. सुरुवातीला छोट्या छोट्या स्केच पासून ते आता मोठ्या वॉल पेंटिंग, पोर्टेट्स च्या ऑर्डर पर्यंत प्रवास झाला आहे. मी जे आर्टवर्क करतो त्याचे tutorial विडिओ माझ्या चॅनेल वर तुम्हाला पाहायला मिळेल.
https://youtube.com/channel/UC-nXT4tzC9XVRhMrYEgKRZg
क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’
Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.”
– UNHCR, Policy on Refugee Children
मायबोलीकर युट्यूबर्स : माझं ‘फॅशन्/स्टायलिंग्/मेंदी/क्राफ्ट्स’ याबद्दल चॅनल , ‘Glory of Henna Official
कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :
डायरी
मायबोलीकर सदस्यांच्या गझला वाचत वाचतच , गझल पहिल्यांदाच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.यावर
सुधारणेसाठी जाणकारांच्या सूचना याव्यात,म्हणून टाकत आहे.
आयुष्याची याही वर्षी नवी डायरी आली आहे..
तुझ्यावीना जगायचीही माझी तयारी झाली आहे..
नव नव्या संकल्पांच्या शपथा घेऊन झाल्या आहेत..
मुद्दाम या ही वर्षी तुला त्यातून सूट दिली आहे !
तसं माझं भविष्य मी आधीच लिहून ठेवलंय बघ !
प्रत्येक दिवशी फक्त तुझीच आठवण लिहिली आहे!
आधी जेव्हा तू नसायचीस तेव्हा त्रास व्हायचा..
पण आता रेटत जगायची मात्र सवय झाली आहे..!
अण्णा
संपली माया संपली काया
संपला तो आधार माहेरचा.
संपली नाती, संपला देह
संपला तो आहेर माहेरचा.
सुख दुखाच्या वाटेवरी
साद घालिते मी तुला
कधी ना वाटे आज अवेळी सोडूनी जाशी तू मला
आजोबा -नातीचे हे नाते
जिवा पलीकडे मी जपले.
शेवटची ती भेट ही नाही
दूर देशीला मी दडले.
माहेरचे ताे दार माझे,
ओसाड पडले घर आता
बोलला का नाहीस तू
शेवटचे जाता जाता
संपला अध्याय तुझा ,संपला तुझा धडा