....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार!
माझ्या शब्दांमध्ये नाही इतके सामर्थ्य
की मी गावी 'गौतमाची' महती!
यत्न हा दिशा मिळावी पांथस्थाला;
कळावी जगण्याची गूढ नीती!!
जेव्हा दुःख जाणवले गौतमाला,
मुक्ती मार्गाची लागली चाहूल!
शोधण्यास ते सत्य निघाले;
त्यागिले त्यांनी यशोधरा अन् तान्हा राहुल!!
दुःख-मुक्ती मिळावी संसाराला,
हा एकच होता त्यांचा ध्यास!
दमन व्हावे दु:ख-तृष्णेचे;
दरवळावा शांती अहिंसेचा सुवास!!
गूढ उकलले या मर्मबंधाचे,
बोधिवृक्षाखाली बुद्ध झाले निर्माण!
दिपवून टाकला समस्त संसार;
उजळल्या दाही दिशा झाल्या गतिमान!!
पुन्हा बरसल्या स्वातीच्या सरी,
जलबिंदू झाले निर्माण!
किमया त्यांची शिंपल्यामध्ये;
शिरुन झाली मोत्यांची खाण!!
युगानुयुगे हा खेळ जलबिंदूचा,
नाही कळला कधी जीवाला!
निसर्गाचे हे कालचक्र;
घेई गिरकी क्षणाक्षणाला!!
आसमंतात रचला खेळ,
झालो आनंदाच्या लाटांवर स्वार!
मागोवा घेती सुख-दु:खाचा;
अन् उघडती आठवणींचे द्वार!!
नव्हतीच कधी अपेक्षा स्वप्नांची,
तरी का करीतो पाठलाग!
ही तर रीत जगण्याची;
फक्त वेड्या मनाला यावी जाग!!
(वाचकांना हा प्रश्न पडला असेल. कथेचं शीर्षक "शासकीय तंत्रनिकेतनातलं कॉपी प्रकरण" आहे पण कॉपी प्रकरण अजून कुठे आढळलेलं नाही तर या कथेची सांगता कॉपी प्रकरणानेच होणार आहे)
..... 'अविनाश', 'मनोहर', आणि 'राजाराम' हे तिघे कॉलेजच्या वस्तीगृहात राहत होते तर 'पांडे' आणि 'गोट्या' आपल्या घरी! पण त्यांना आज रात्री होस्टेलला थांबायचे होते कारण ते पिऊन टुल्ल झाले होते. होस्टेलचे गेट रात्री १०:४५ ला बंद होत असे अशा वेळेस काय करायचे तर ते सर्वत: सिक्युरिटी गार्ड वर अवलंबून असायचे.'सेक्युरिटी गार्ड' ओळखीचा असला की त्याला दहा- वीस रुपये किंवा गुटखा पुडी देऊन आपल्या मित्रांना आत मध्ये सोडत असे. पण नेमकं त्या दिवशी नाईट ड्युटी वर 'सदाशिव मामा' होते 'सदाशिव मामा' इमानेइतबारे काम करायचे. होस्टेलचे सुरक्षारक्षक म्हणून ते बारा वर्षापासून कार्यरत होते.
.......प्रिय मायबोलीकर बहुतांश वाचकांनी आपले काॅलेज जीवन अनुभवले असेल तर आपल्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा द्यायला घेऊन आलो आहे महाविद्यालयीन जीवनाची सफर! चला तर मग या सफरीचा आनंद घेऊया मनमुराद!
"सुर्य जरी मावळला,
तरी त्याचा संधिप्रकाश रेंगाळत असतो!
त्यांचा सहवास जरी संपला;
तरी आठवणींचा सुगंध दरवळत असतो!!"
.... घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती. सायरन चा आवाज करत घराजवळ ॲम्बुलन्स थांबली. पोलिसांची जीप पण बाहेर उभी होती ॲम्बुलन्स मधले कर्मचारी स्ट्रेचर घेऊन आत मध्ये शिरले. खिडकीजवळ एक पारवा फडफड करीत होता. पीएसआय एका इसमास जवळ चर्चा करीत उभे होते. वातावरणामध्ये एक दर्प सुटला होता. आतमध्ये एक पंचविशीतला एक तरुण देह निपचित, निशब्द पडला होता. जवळच विषाची बाटली पडली होती. आणि त्याच्या हातात एक चुरगाळलेला कागद होता. इन्स्पेक्टर ने तो कागद उघडला त्या कागदावर लाल शाईने लिहिलेले होते.
.............घड्याळ्याच्या गजराने मृत्युंजय खडबडून जागा झाला.रात्रीचे १२ वाजले होते.शरीर घामाने ओलेचिंबं झाले होते.त्याचा घसा कोरडा पडला होता.तो गटागट पाणी प्याला.सर्वत्र काळोख दाटलेला होता.घड्याळ्याच्या टिकटिक प्रमाणे त्याच्या हृदयाची स्पंदने आवाज करत होती.त्याचा जीव कासावीस झाला त्याला गार वाऱ्याची गरज भासली.तो तसाच बाहेर पडला.बाहेर कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज येत होता.जवळच एक उद्यान होते.रात्री सहसा तिथे पहारेकरी नसायचा.गेटवर चढून त्याने आतमध्ये उडी मारली.विराण शांतता पसरली होती जणूकाही भयाण विनोदाचे अभेद्य कवच!
आईच्या गर्भपोकळीत
प्रवास झाला सुरू!
आई हीच माझी विधाता;
आई हीच माझी गुरू!!
मला या जगात आणण्यासाठी
किती सहन केल्या तीने वेदना!
आयुष्य व्यापीले सर्वस्व तीने;
तीच माझ्या आयुष्याची प्रेरणा!!
आयुष्याची ती गुरुकिल्ली
कल्पवृक्षाची ती छाया!
आनंदी माझ्या जीवनाचा;
तीच आधारभूत पाया!!
जन्मोजन्मी न फिटणार
हे मातृत्वाचे ॠण!
आठवतो तो सर्व प्रवास;
जेव्हा होतो मी एक भ्रूण!!
Palette knife ने केलेले स्टील लाईफ.
.