आईच्या गर्भपोकळीत
प्रवास झाला सुरू!
आई हीच माझी विधाता;
आई हीच माझी गुरू!!
मला या जगात आणण्यासाठी
किती सहन केल्या तीने वेदना!
आयुष्य व्यापीले सर्वस्व तीने;
तीच माझ्या आयुष्याची प्रेरणा!!
आयुष्याची ती गुरुकिल्ली
कल्पवृक्षाची ती छाया!
आनंदी माझ्या जीवनाचा;
तीच आधारभूत पाया!!
जन्मोजन्मी न फिटणार
हे मातृत्वाचे ॠण!
आठवतो तो सर्व प्रवास;
जेव्हा होतो मी एक भ्रूण!!
मध्यंतरी आमच्या भाचीच डोहाळ- जेवण होत. तेव्हा सगळे म्हणाले ,''मामी तुमच डोहाळे- गीत ऐकवा न , '' मी आमच्या कन्येच्या डोहाळ -जेवणाच्या वेळेला माझ मनोगत व्यक्त केल होत. [काव्यात ] . तिला शुभेच्छा- कार्ड [ग्रिटींग ] म्हनुन ते दिल होत. पण आता ते निट आठवतही नव्हत . पण जुने अलब्म पहात असतांना त्या ग्रीटींगचा फोटो सापडला. त्यावरुन ते गीत ऐकवल सर्वांना. ते येथे देत आहे.. ७-८ वर्षापुर्वीच आहे ते. समस्त मातांच्या भावना त्यातुन व्यक्त होतील.