
माझं लहानपण छोट्या गावात गेलं. घर भाड्याचं असलं तरी घरापुढे अंगण होत. अंगणात तगर, मोगरा, शेवंती, कुंदा, प्राजक्त ,अबोली अशी अनेक फुलझाडं होती. हार आणि वेण्या करणं हा माझा छंदच होता. असतील त्या फुलांचा रोज हार/वेणी मी रोज करत असे. पुढे शहरात आल्यावर गजरे/ हार हुकमी मिळत असले तरी स्वतः गजरा हार वेणी करण्याच्या सुखाला मात्र मुकले होते.
पूर्वी स्त्रियांचे केस मोठे असत आणि केसात वेण्या, फुलं माळण्याची आवड होती. चाफ्याची, शेवंतीची, गुलछडी ची, अबोलीची, कोरांटीची अश्या अनेक प्रकारच्या वेण्या स्त्रिया अगदी हौसेने अंबाड्यावर घालत असत. आता जनरली केस लहान असतात , केसांचा स्पेसिफिक कट केलेला असतो म्हणून काळाच्या ओघात ह्या वेण्या गडप झाल्यात जवळ जवळ. मला घालायला नाही आवडली तरी करायला खूप च आवडते. पायाच्या अंगठ्यात दुपदरी दोरा धरून त्यात फुल ठेवायचे आणि दुसरा डोरा वरून खालून उलट सुलट फिरवून ते फिक्स करायचे. (साधारण tating सारखी वीण )
सध्या मुक्काम सातारला आहे. एका परिचित मुलीला माझं हे फुलांचं वेड माहीत आहे. तिने मला तिच्या बागेतली फुल आवर्जून आणून दिली. म्हणून त्या फुलांच्या दोन वेण्या केल्या. खूप मजा आली करताना. स्मरण रंजनात वेळ मस्तच गेला.
हा फोटो
खुप सुंदर
खुप सुंदर
छान
छान
सुंदर गुंफण.
सुंदर गुंफण.
वा वा अप्रतिम.
वा वा अप्रतिम.
मस्त अतिशय प्रसन्न फोटो आहे.
मस्त अतिशय प्रसन्न फोटो आहे. कोणते फूल आहे हे? जाई जुई सायली ? सध्याच्या प्रथे नुसार नेक्स्ट टाइम वेणी कशी बनवायची ते व्हिडिओ ट्युटोरिअल पण द्या. त्या गाठी कश्या मारल्या ते शिकवा.
वेळ असेल तर एक मोठा लेख लिहा वेण्यांवर व कोकणी फुलांवर. मी सध्या एक एक चाफ्याचे फूल माळते फिरायला गेले की सापडले तर. वरच्या लेव्हलला झाडे आहेत त्यामुळे खाली फिरले की वरून वर्शाव होत असतो. ती जमवून एक वेणी करून बघेन.
सुंदर फुलांची सुंदर वेणी!!
सुंदर फुलांची सुंदर वेणी!!
खूप सुंदर.. हि फुले मिळतात
खूप सुंदर.. हि फुले मिळतात इकडे.. नाव माहित नाही.. पण वास छान येतो या फुलांना.
वेणी खुपच सुंदर....
वेणी खुपच सुंदर....
त्या गाठी कश्या मारल्या ते शिकवा>>
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!
खूपच सुंदर दिसतेय वेणी !!
खूपच सुंदर दिसतेय वेणी !!
सुंदर दिसतेय वेणी. ! ही
सुंदर दिसतेय वेणी. ! ही कुंदाची फुले असावीत.
सुंदर! कुंदाचीच फुलं वाटतायत.
सुंदर! कुंदाचीच फुलं वाटतायत.
खुपच मस्त ममो! माझ्या आईला पण
खुपच मस्त ममो! सुरेख दिसताएत वेण्या. माझ्या आईला पण यायची ही वेणी. तिने आम्हाला शिकवली पण होती. माझ्या चुलत बहिणीला अजूनही येते. तिच्या घराभोवती बाग आहे, ती करते ह्या वेण्या. आम्ही मोग-याचा गजरा पण असा फिरवून किंवा गाठ मारून करायचो.
मला अजून एक वेणी आठवली , गुलबक्षीच्या फुलांची. माझी आजी नुसत्या फुलांची वेणी करायची आणि त्या फुलाच्या देठाला मण्यासारखं असतं ते मणी सगळे मागच्या बाजूला यायचे. खुपच सुरेख. हि वेणी पण चुलत बहिणीला येते.
सुंदर
सुंदर
ही मुंबईतली चमेली आणि
ही मुंबईतली चमेली आणि गोव्यातली जाई आहे.
थॅंक्यु सगळ्यांना...खरंच
थॅंक्यु सगळ्यांना...खरंच व्हडिओ हवा काढायला.
गुलबक्षी , बुच मधुमालती ह्यांच्या फुलं एकमेकात गुंफून छान वेण्या होतात दोऱ्या शिवाय ही.
ही मुंबईची चमेली, गोव्याची जाई आणि इथला कुंद☺️
खुप सुंदर बनवलं आहे. फोटो पण
खुप सुंदर बनवलं आहे. फोटो पण मस्त
गुलबक्षी , बुच मधुमालती
गुलबक्षी , बुच मधुमालती ह्यांच्या फुलं एकमेकात गुंफून छान वेण्या होतात दोऱ्या शिवाय ही.>> हो मी बुचाच्या वेण्या केल्या आहेत. लांब देठ असतात .
देवाने पांढर्या फुलांना अतिशय सुरेख सुवास दिले आहेत. कायम मोहात पाडतात.
माझी आजी कोरंटीच्या पिवळ्या
माझी आजी कोरंटीच्या पिवळ्या फुलांच्या गुंफून वेणी बनवायची.
मनिमोहोर खूप छान बनवली आहे जाईची वेणी.
अतिशय सुंदर !! आजोळचे
अतिशय सुंदर !! आजोळचे कुंदाचे झाड आठवले . तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्मरणरंजनात मन फिरून आले .
मनीमोहोर, खूप सुंदर. लहानपणी
मनीमोहोर, खूप सुंदर. लहानपणी आई अशी वेणी बनवायची त्याची आठवण झाली. मला खूप आवडतात वेण्या. व्हिडिओ टाकलात तर आम्ही सुध्दा शिकू.
आम्ही ज्याला कुंद म्हणायचो
आम्ही ज्याला कुंद म्हणायचो त्याला काटे असायचे आणि कळ्या टपोऱ्या आणि पांढऱ्याशुभ्र. कुंदकळ्यांसारखे दात म्हणजे काय ते त्या लांबट टपोऱ्या कळ्यांवरून कळायचे.
आहा!सुरेख अगदी आणि
आहा!सुरेख अगदी आणि नेहमीप्रमाणे प्रसन्न लेख!
अत्यंत सुंदर!
अत्यंत सुंदर! प्रत्येक दिवसाची सुरुवात हा फोटो बघून करायला हवी.
हे बघताक्षणीच टोपलीभर गजर्याचे गोल चेंडू घेउन बसलेल्या आणि एकीकडे सतत गोल फिरवून गजरे गुंफत असलेल्या, चमकी घातलेल्या गजरेवाल्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
वाह ममो! किती सुरेख सुबक
वाह ममो! किती सुरेख सुबक वेण्या आहेत! प्रसन्न वाटलं फोटो पाहून. इतरही कोणत्या वेण्या केल्यात इतक्यात तर इथे जरूर फोटो, व्हिडिओ टाका. पहायला आवडेल.
सुंदर!
सुंदर!
मी देखील माहेरी अशा अंगठ्यात दोरा पकडून वेण्या करत असे. कापलेल्या केसांमुळे स्वतः कधी वेण्या घातल्या नाहीत पण इतरांसाठी वेण्या गुंफायला मला आवडायचे. जोडीला कोरांटी आणि गुलबक्षीच्या नुसते देठ गुंफून केलेल्या वेण्या.
वा ममोताई , तुम्ही नेहमीच
वा ममोताई , तुम्ही नेहमीच जुन्या आठवणी जाग्या करता
.
मला नक्की आठवत नाही कोण करायचं , पण लहानपणी अशा गुलबक्षी , बूच आणि आबोलीच्या वेण्या माळलेल्या आठवतात .
गुलबक्षी , बुच मधुमालती ह्यांच्या फुलं एकमेकात गुंफून छान वेण्या होतात दोऱ्या शिवाय ही. >>>> गुलबक्षीच्या आठवतात
वाह!!
वाह!!
वाह काय सुरेख वेण्या आहेत.
वाह काय सुरेख वेण्या आहेत. बालपण आठवलं खरंच. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कशी परफेक्ट जमते
सुरेख दिसत आहे वेणी. किती
सुरेख दिसत आहे वेणी. किती सुबक केली आहे.
मला पण गुलबक्षीची वेणी फार आवडते. गुलाबांच्या पाकळ्याची वेणी पण फार सुरेख दिसते.
Pages