अण्णा

Submitted by divyanshi on 21 December, 2020 - 09:18

संपली माया संपली काया
संपला तो आधार माहेरचा.
संपली नाती, संपला देह
संपला तो आहेर माहेरचा.
सुख दुखाच्या वाटेवरी
साद घालिते मी तुला
कधी ना वाटे आज अवेळी सोडूनी जाशी तू मला
आजोबा -नातीचे हे नाते
जिवा पलीकडे मी जपले.
शेवटची ती भेट ही नाही
दूर देशीला मी दडले.
माहेरचे ताे दार माझे,
ओसाड पडले घर आता
बोलला का नाहीस तू
शेवटचे जाता जाता
संपला अध्याय तुझा ,संपला तुझा धडा
करते हे पुस्तक बंद मी आता
आठवणींचे गाठोडे सोडा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users